मुंबई : प्रतिनिधी ऐन शहरातील वरळी, नायगाव, ना.म.जोशी मार्ग व शिवडीमधील बीडीडीच्या २०७ चाळींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. या पुनर्विकास झालेल्या सदनिका पुन्हा मुळ चाळकऱ्यांना देताना फक्त एक हजार रूपये मुद्रांक शुल्क आकरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे फक्त एक हजार रूपयात ही ५०० चौरस फुटाची सदनिका मुळ चाळकऱ्यांना …
Read More »मॉलमध्येही आता १८ वर्षाखालील मुला-मुलींना मिळणार रात्री १० वाजेपर्यत असा प्रवेश #BreakTheChain अंतर्गत सुधारीत मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई: प्रतिनिधी अखेर राज्य सरकारने मॉल्सनाही रात्री १० वाजेपर्यत सुरु ठेवण्यास मान्यता दिली असून १८ वर्षा खालील मुला-मुलींचे अद्याप लसीकरण सुरु झालेले नसल्याने त्यांना मॉलमध्ये प्रवेशासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, शाळा अथवा महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखविणे आवश्यक करण्यात आले आहे. कोरोना निर्बंधासाठी असलेल्या ब्रेक द चेन अंतर्गत मार्गदर्शक सूचनांमध्ये आरोग्य विभागाने आज सुधारणा …
Read More »लोकल प्रवासासाठी लसप्रमाणपत्राची पडताळणी करायचीय, मग या सोप्या गोष्टी करा मुंबई महापालिकेने कडून १०९ स्थानकांवर केली ऑफलाईन तपासणी सुविधा
मुंबई: प्रतिनिधी मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांना १५ ऑगस्ट २०२१ पासून उपनगरीय रेल्वे प्रवास करण्यास मुभा देण्याची घोषणा राज्याचे माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यानुसार, नागरिकांना लोकल रेल्वे प्रवास करणे सोयीचे व्हावे, त्यांना मासिक रेल्वे प्रवास पास मिळावा, यासाठी कोविड लसीकरण पूर्ण झाल्याची ऑफलाईन पडताळणी प्रक्रिया उद्या बुधवार ११ ऑगस्ट २०२१ …
Read More »कलासक्त मुख्यमंत्री तरी २४ वर्षे लढा देणाऱ्या जे.जे च्या त्या ११ शिक्षकांना न्याय देणार का? न्यायालयाने दोनवेळा आदेश देवूनही शिक्षक कंत्राटावरच
मुंबई: प्रतिनिधी भारतासह देश विदेशात चित्रकला, शिल्पकला, पेंटींग आदी क्षेत्रात जे.जे.स्कूल ऑफ आर्ट या संस्थेतून अनेक विद्यार्थी बाहेर पडले आणि त्यांचे नाव झाले. या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आकार देणाऱ्या ११ शिक्षकांवर आपल्या न्याय हक्कासाठी २४ वर्षापासून लढा सुरु ठेवण्याची वेळ आली आहे. मात्र मंत्रालयातल्या झारीतील शुक्रचार्यांकडून यात सातत्याने अडथळा आणला जात …
Read More »रखडलेल्या प्रकल्पांचा पुनर्विकासाचे भवितव्य आता एसआरए आणि म्हाडाच्या हाती स्वत: विकसित करणार-गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड असल्याची माहिती
मुंबई : प्रतिनिधी अनेक बँकांनी तसेच वित्तीय संस्थांनी आशयपत्र (LOI) बघून विकासकांना पैसे दिलेले आहेत. खरंतर आशयपत्र (LOI) बघितल्यानंतर वित्तीय संस्थांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे संपर्क साधणे गरजेचे होते आणि मगच पैसे द्यायला हवे होते. परंतु तसे झाले नाही. करोडो रुपये झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये गुंतविण्यात आले आहेत तथापि आशयपत्राच्या पुढे विकासकाने कुठलेही काम …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचा फायदा ४५ वर्षावरील नागरीकांनाच : ४० लाख प्रवाशी वंचित पहिला डोस घेणाऱ्यांच्या तुलनेत दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या कमी
मुंबई : विशेष प्रतिनिधी १५ ऑगस्टपासून मुबंईकरांसाठी लोकल प्रवास करण्यास परवानगी देत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली असली तरी त्यासाठी दोन डोस घेणाऱ्यांच पहिल्या टप्प्यात परवानगी देण्यात आली आहे. मात्र पहिला डोस घेणाऱ्यांच्या तुलनेत दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या कमी असल्याने या सवलतीचा सर्वाधिक फायदा तरूणांपेक्षा प्रौढ नागरीकांनाच होणार …
Read More »‘मिठी’ होणार गटारमुक्त पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची घोषणा
मुंबई: प्रतिनिधी गाळ काढणे, तरंगता कचरा वेगळा करणे तसेच आजूबाजूने येणारे घाण पाणी रोखणे या तीन टप्प्यांमध्ये काम करून ‘मिठी’ ला नदीचे मूळ स्वरूप प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. याकामी सर्वांचे सहकार्य गरजेचे असल्याचे प्रतिपादन पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. मिठी नदी स्वच्छतेच्या पायलट प्रकल्पाचे …
Read More »कोट्यावधीच्या मोकळ्या जागेचे आरक्षण बदलून भूखंड बिल्डरांच्या घशात भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भाजपाचे आंदोलन
मुंबई: प्रतिनिधी एकिकडे निसर्गाच्या प्रकोपाला मुंबईकरांना दरवर्षी पावसाळ्यात सामोरे जावे लागत असताना मुंबईतील उरलेल्या सुरल्या मोकळ्या जागांची आरक्षणे बदलून बिल्डरांच्या घशात घातल्या जात आहेत. वांद्रे पश्चिम येथील अशाच २२ भूखंडाचे आरक्षण बदलल्याचा निषेध करीत महापालिका आणि राज्य सरकारच्या विरोधात भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भाजपा कार्यकर्त्यांनी आज …
Read More »मुंबई महापालिका निवडणूकीच्या प्रचारासाठी सोनिया गांधी, राहुल गांधी शिवाजी पार्कवर होणार मेळावा !: एच. के. पाटील
मुंबई: प्रतिनिधी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने तयारी सुरु केली आहे. काँग्रेस स्थापना दिनाचे औचित्य साधत २८ डिसेंबर रोजी शिवाजी पार्कवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तसेच राहुल गांधी यांच्या उपस्थितीत भव्य मेळावा घेतला जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी दिली. टिळक भवन येथे मुंबई काँग्रेसच्या छाननी …
Read More »दंडाची रक्कम भरत भाजपा नेते-कार्यकर्त्यांनी केला लोकलने प्रवास अटक केली तरी सर्वसामान्यांच्या लोकल सेवेसाठी संर्घष सुरूच राहणार-दरेकर यांचा इशारा
मुंबई: प्रतिनिधी लसीचे दोन डोस घेतलेल्या मुंबईच्या सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकलसेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली आज चर्चगेट रेल्वे स्थानकात भाजपच्या वतीने रेल भरो आंदोलन करण्यात आले. सरकारच्या दडपशाहीला न जुमानता दरेकर यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांसह जोरदार घोषणाबाजी करत चर्चगेट रेल्वे स्थानकात प्रवेश करून चर्चगेट …
Read More »
Marathi e-Batmya