मुंबई

स्मार्ट सिटी- क्लिन सिटीबरोबरच “ग्रीन सिटी” संकल्पना अंमलात आणा वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे बांधकाम व्यावसायिकांना आवाहन

मुंबई  : प्रतिनिधी स्मार्ट सिटी- क्लिन सिटी संकल्पनेबरोबर “ग्रीन सिटी” संकल्पना अंमलात आणा, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.  राज्यात जुलै महिन्यात होणाऱ्या १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी आज वनमंत्री मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली बांधकाम व्यावसायिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. हरित शहरांच्या निर्मितीमध्ये बांधकाम व्यावसायिकांनी योगदान …

Read More »

अधिकाऱ्यांमधील वादानंतर अखेर डी.के.जैन यांची राज्याच्या मुख्य सचिव पदी नियुक्ती नागपूर कनेक्शन कामाला आल्याची मंत्रालयात चर्चा

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील तीन ज्येष्ठ अधिकाऱ्यांमधील मुख्य सचिव पदावरील दाव्याच्या वादानंतर अखेर राज्याच्या मुख्य सचिव पदी वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव दिनेश जैन यांची नियुक्ती राज्य सरकारने केली. जैन हे दुपारी ४.३० वाजता आज सोमवारी आपल्या पदाचा कार्यभार मावळते मुख्य सचिव सुमित मलिक यांच्याकडून स्विकारतील. डि.के.जैन हे भारतीय प्रशासन …

Read More »

मुंबई क्रिकेट असोसिएशनने आधी भाडेपट्टा करारातील वाद मिटवला तरच परवानगी वाद मिटल्यावर माऊंड गॅलरी बांधण्यास एमएमआरडीए परवानगी देणार

मुंबई : प्रतिनिधी मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एमसीएने जमिन देताना करण्यात आलेल्या भाडेपट्टा करारातील नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लघंन केले आहे. त्यासंदर्भात वाद आहेत. हे वाद पहिल्यांदा मिटवावेत त्यानंतर जी ब्लॉकमधील दिलेल्या जमिनीवर माऊंड गँलरी बांधण्यास परवानगी देणार असल्याचे एमसीएचे अध्यक्ष तथा मुंबई भाजपचे अध्यक्ष अँड.आशिष शेलार यांच्या एमसीएला दिले आहेत. …

Read More »

राज्यपालांनी आता प्र.कुलगुरू- परिक्षा नियंत्रक आणि कुलसचिवांची नियुक्ती करावी शिवसेना नेते आदीत्य ठाकरे यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू संजय देशमुख यांच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर होण्यास वेळ लागला. तसेच त्याच्या फटका अनेक विद्यार्थ्यांना बसू लागल्याच्या विरोधात शिवसेनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यामुळे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी देशमुख यांना कुलगुरू पदावरून हटवित नवे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांची नियुक्ती केल्याबद्दल राज्यपालांचे …

Read More »

अखेर मुंबई विद्यापीठाला मिळाला नवा कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

मुंबई : प्रतिनिधी मुंबई विद्यापीठाच्या परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात झालेला गोंधळ आणि त्यात विद्यापीठ प्रशासनाचा गलथानपणा आदी गोष्टींमुळे माजी कुलगुरू संजय देशमुख यांची कारकिर्द वादग्रस्त ठरली. त्यामुळे देशमुखांना निरोप देत नव्या कुलगुरूचा शोध घेण्याचे आदेश राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी राज्य सरकारला देत त्याकरीता नवी समितीही स्थापन केली. अखेर दोन-तीन …

Read More »

मुंबईतील केंद्र सरकारच्या जमिनीवरील झोपड्यांच्या पुर्नविकासासाठी लवकरच चर्चा पश्चिम क्षेत्रीय परिषदेत मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे निर्देश

मुंबईतील केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या ताब्यात असलेल्या जमिनींवरील झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासासाठी संबंधित विभागांसोबत राज्याची बैठक घेऊन लवकर तोडगा काढण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पश्चिम क्षेत्रीय परिषदेच्या बैठकीत याबाबत मागणी केली होती. गांधीनगर (गुजरात) येथे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम क्षेत्रीय परिषदेची २३ वी …

Read More »

नालेसफाईची माहिती प्रसिध्द करण्याबरोबरच गाळ टाकण्याचे चित्रिकरण करा स्वच्छतेकडे दुर्लक्ष न करण्याचा भाजप मुंबई अध्यक्ष अँड.आशिष शेलार यांचा महापालिकेला इशारा

मुंबई : प्रतिनिधी मुंबईतील नालेसफाईबाबत महापालिका, रेल्‍वे प्रशासनासोबत‍ दोन वेळा बैठक घेत्‍यानंतर तसेच प्रत्‍यक्ष कामाची पाहणी करून मुंबईतील भाजप नगरसेवकांनी केलेल्‍या पाहणीचा आढावा घेतल्‍यानंतर आज पत्रकारांशी बोलताना महापालिकेच्‍या स्‍थायी समितीने नालेसफाईच्‍या कामांबाबत सावधानता बाळगावी, दर आठवड्याला नाले सफाईची माहीती प्रसिध्द करण्याबरोबरच डंपींग ग्राऊंडवर गाळ टाकण्याचे सीसीटीव्हीद्वारे चित्रिकरण करण्याची सूचना भाजप …

Read More »

बीकेसीच्या धर्तीवरील कल्याण ग्रोथ सेंटरच्या उभारणीत भूमिपुत्रांना भागीदारी पायाभूत विकासासाठी एक हजार कोटी रूपयांच्या तरतूदीची मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी उद्योगाकरिता मुंबईवर अवलंबून असलेल्यांना आता दुसरा पर्याय तयार होणे आवश्यक आहे. त्यासाठी बीकेसी अर्थात वांद्रे-कुर्ला संकुलाच्या धर्तीवर कल्याण ग्रोथ सेंटरचे कार्य कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात येईल. तसेच स्थानिक लोकांचा फायदा व्हावा यासाठी त्यांना विकासात भागिदार बनवून घेण्यात येणार असून स्थानिकांनी संयुक्त मोजमाप करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

अखेर मुख्यमंत्र्यांनी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूरचा हट्ट पुरविला पनवेल महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची अखेर बदली

मुंबई : प्रतिनिधी मुंबई महानगरात नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महापालिकेच्या आयुक्त पदी मृदू व जलसंधारण मंत्री राम शिंदे यांचे बंधू डॉ.सुधाकर शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र आयुक्त पदी डॉ.शिंदे यांच्या काम करण्याच्या शैलीचा त्रास भाजपच्याच नगरसेवकांना होवू लागला. त्यामुळे त्यांची आयुक्त पदावरून बदली करण्यासाठी महापालिकेतील सत्ताधारी असलेल्या भाजप नगरसेवकांसह …

Read More »

मुंबईतील फायर ऑडिट झालेल्या इमारतीची माहिती देण्यास अग्निशमन दलाची टाळाटाळ माहिती अधिकार कायद्यालाही वाटाण्याच्या अक्षता लावण्याचा प्रयत्न

मुंबई : प्रतिनिधी मुंबईतील इमारतींना आगी लागण्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असून मुंबई अग्निशमन दलातर्फे फायर ऑडिटकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळेच आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबईतील फायर ऑडिट झालेल्या इमारतीची माहिती मागितली असता सरळ आणि स्पष्ट माहिती देण्यास अग्निशमन दलाने टाळाटाळ केली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई अग्निशमन …

Read More »