मुंबईतील कबुतरखान्याचा वाद चिघळला … मराठी आणि जैन समुदायाचे शक्ती प्रदर्शन

दोन दिवसापुर्वी जैन धर्मियांनी दादर येथील कबुतरखाना बंदी संदर्भात आंदोलन केले त्याच्यावर कारवाई नाही. मात्र आज मराठी एकीकरण समितीने आंदोलन करताच पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. त्यामुळे आता कबुतरखान्याचा वाद अधिक चिघळला आहे. जैन मुनींच्या शस्त्र उचलण्याच्या वक्तव्यानंतर हे आंदोलन अधिक तीव्र झाले. पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. समितीने कोर्टाच्या निर्णयाचा आदर करण्याचे आवाहन केले आहे. दोन दिवसापूर्वी जैन धर्मियांनी आंदोलन केले त्यावेळी पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही मग आताच कारवाई का, मराठी माणसावर कारवाई का असा सवाल आंदोलकांचा आहे.

दादर येथील कबुतरखाना बंदीच्या समर्थनार्थ आज मराठी एकीकरण समिती आंदोलनाची हाक दिली होती. जैन मुनींनी शस्त्र उचलण्याची भाषा केल्यानंतर आज मराठी एकीकरण समितीच्या वतीने केले. यावेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने कबुतरखान्याचा वाद चिघळल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यावेळी मराठी एकीकरण समितीकडून पोलिसाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

कबुतरखाना बंदीचा विषय धार्मिक नाही. सामाजिक आहे. त्यामुळे कबुतरखाना बंदीला जातीयवादाचा रंग देऊ नका. त्या दिवशी जैन समाजाने जे आंदोलन केले, त्यावेळी तुम्ही जैन समाजाच्या आंदोलकांवर काही कारवाई केली का, असा सवाल यावेळी आंदोलकांनी केला. तसेच मराठी एकीकरण समितीने कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा सन्मान करावा, असे आवाहन यावेळी केले.

आंदोलकांना पोलिसांनी आंदोलनापूर्वी नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे अनेक आंदोलक डोक्यावर टोपी घालून जोरदार घोषणाबाजी केली. तसेच काही जणांना ताब्यातही घेतले जात आहे. कबुतरखान्याला छावणीचे स्वरुप आले आहे. या परिसरातील आजूबाजूच्या सोसायटी मधील रहीवाशांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यामुळे मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली जात आहे.

मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख आंदोलनस्थळी पोहोचताच पोलिसांनी त्यांना घेराव घालत ताब्यात घेतलं आहे.यावेळी गोवर्धन देशमुख यांनी “पोलिसांनी आम्हाला आमची भूमिका मांडू द्यावी, आम्ही फक्त आमचे म्हणणं मांडायला आलो आहोत. आम्ही फक्त पोलिसांना निवदेन देण्यासाठी आलो आहोत, असे गोवर्धन देशमुख म्हणाले. यावेळी गोवर्धन देशमुख यांनी पोलिसांनी दुटप्पी भूमिका घेऊ नये. त्यांनी ही दडपशाही थांबवावी, तसेच आणीबाणीचा काळ आणू नये”, असेही गोवर्धन देशमुख यांनी पोलिसांना ठणकावले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दादर कबुतर खाना परिसरातील दुकाने दुपारी एक वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे पोलिसांकडून आदेश देण्यात आले होते. तसेच जैन मंदिराचा मुख्य दरवाजा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

About Editor

Check Also

मुंबईत दुचाकी वाहनांसाठी ‘MH01FH’ नवीन नोंदणी मालिकेची सुरुवात प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून माहिती जाहिर

प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) येथे दुचाकी व चारचाकी वाहनांची नोंदणी केली जाते. सध्या दुचाकी खासगी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *