मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी ५ सप्टेंबर ऐवजी ८ सप्टेंबरला ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल

मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यात ईद-ए-मिलाद निमित्त सार्वजनिक सुट्टी यापूर्वी ५ सप्टेंबरला जाहीर करण्यात आली होती. आता ही सुट्टी शुक्रवार ५ सप्टेंबर ऐवजी सोमवार ८ सप्टेंबरला असणार आहे. मुंबई शहर व उपनगर जिल्ह्याव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांसाठी शुक्रवार दि. ५ सप्टेंबर ही सार्वजनिक सुट्टीची तारीख कायम ठेवण्यात येत आहे.

राज्यात बंधुता आणि एकता टिकावी या हेतूने मुस्लीम समाजाने ईद-ए-मिलाद निमित्त काढला जाणारा जुलूस कार्यक्रम ६ सप्टेंबर ऐवजी ८ सप्टेंबर २०२५ रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे, मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील ५ सप्टेंबर रोजी जाहीर झालेली सार्वजनिक सुट्टी रद्द करून ती ८ सप्टेंबरला जाहीर करण्यात आली आहे. यामुळे मुंबई शहर व उपनगरातील शासकीय कार्यालये ५ सप्टेंबर रोजी नियमित सुरु राहतील, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रकाद्वारे दिली आहे.

शनिवार ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदूचा सण आहे. राज्यात बंधुता आणि हिंदू – मुस्लिम ऐक्य राखण्यासाठी मुस्लीम समुदायाने जुलूसचा कार्यक्रम ८ सप्टेंबर २०२५ रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शुक्रवार दि. ५ सप्टेंबर रोजीची सुट्टी आता सोमवार दि. ८ सप्टेंबर रोजी देण्यात येणार आहे.

About Editor

Check Also

केतन अग्रवालच्या हत्येनंतर सिया गोयल, चेतन चौधरीने फोनमधील चॅट केले डिलीट पोलिसांकडून दोघांचे फोन फॉरेन्सिक लॅबला पाठविले

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक केतन अग्रवाल यांची हत्या झाली; त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *