नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल १ वर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण अत्यंत उत्साहात पार पडले.

हा पुतळा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अलौकिक नेतृत्व आणि देदिप्यमान वारशाला वाहिलेली आदरांजली असून, तो महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडवतो. या ऐतिहासिक सोहळ्याप्रसंगी वनमंत्री गणेश नाईक, महिला व बालविकास मंत्री अदिती सुनील तटकरे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर उपस्थित होते. तसेच भूमिपुत्र स्वर्गीय दि. बा. पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापक यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (NMIAL) द्वारे विकसित करण्यात आलेल्या या स्मारकामध्ये ८ फुटांच्या भव्य चबूतऱ्यावर १२ फुटांचा कांस्य धातूचा अर्धपुतळा (बस्ट) बसवण्यात आला आहे. नवी मुंबईतील ‘आकार आर्ट अँड स्कल्पचर’चे शिल्पकार नितीन रोहिदास गोर्डे यांनी हा पुतळा साकारला असून, महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयाने मान्यता दिलेल्या प्रारूपावर आधारित कॉपर अलॉय ब्रॉन्झ (तांबे मिश्रित कांस्य) मध्ये याची निर्मिती करण्यात आली आहे.

आठ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीत पूर्ण झालेली ही वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील एक प्रमुख आकर्षण ठरणार आहे. तसेच विमानतळावर येणाऱ्या देशी-विदेशी प्रवाशांसाठी आणि अभ्यागतांसाठी हे स्थान सांस्कृतिक महत्त्वाचे एक मुख्य केंद्र बनेल यात शंका नाही.

About Editor

Check Also

आयआयटी बॉम्बे मधील विद्यार्थी साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे तीव्र आंदोलन IIT Bombay मधील जाति-आधारित छळाच्या आरोपांची सखोल चौकशी करा, प्रा. सुर्यनारायण डुल्लांना बरखास्त करा: झीनत शबरीन

आयआयटी बॉम्बेचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्ये प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत आयआयटी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *