विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर प्रत्येक पक्षाचे प्रमुख नेते सध्या त्यांच्या निवडणूकीच्या विजयासाठी सातत्याने बैठका, आघाड्या-युती यामध्ये बिझी आहेत. सध्या या सगळ्या धामधुमीत शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची बिकृती बिघडल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले असून त्यांना उद्या डिसार्ज देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच उद्धव ठाकरे यांना रिलायन्स रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
उद्धव ठाकरे यांच्यावर यापूर्वी दोन वेळा शस्त्रक्रिया झालेली आहे. यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या हृदयावर आँजिप्लास्टी झालेली असून त्यांच्या हृदयात स्टेनही बसविण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या मानेच्या सततच्या दुखण्यामुळे मुख्यमंत्री पदावर असताना उद्धव ठाकरे यांच्या मानेवरही शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या अनुषंगाने त्यांच्या प्रकृतीत बिघडली आहे का याचा तपासणी सध्या डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.
उद्धव ठाकरे यांच्यावर आँजिप्लास्टी करण्यात आल्याने त्यांच्या हृदयात पुन्हा ब्लॉकेज निर्माण झाले आहेत का याची तपासणी करण्यात येत आहे. जर उद्धव ठाकरे यांच्या हृदयात पुन्हा नव्याने ब्लॉकेज जर निर्माण झाले असतील पुन्हा एकदा त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. मात्र वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांना रूटीन चेकअपसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व चाचण्या आणि रिपोर्ट चांगले आल्यानंतर उद्या त्यांना रूग्णालतून डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
काल शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, दसऱा सणानिमित्त प्रत्येक जण त्यांच्याकडील शस्त्रपूजन आणि सरस्वती पूजन करतो. प्रत्येकाकडे कोणतं न कोणतं शस्त्र असतं. कोण त्यांच्याकडील गनच शस्त्रपूजन करतो तर कोणी आणखी कशाचं पूजन करतं. पण आमच्याकडे लढवय्य मन आहे. असं सांगितले. बाकी आमच्याकडे शस्त्र आहेतच त्यांच पूजन केले. पण शिवसेना प्रमुखांच्या कुंचल्याची पूजाही आम्ही आज केली. आता सगळ्यांची पूजा करतो आहे अस मश्किलपणे सांगत शिवसेनेची तुम्ही प्रत्येकजण शस्त्र आहात. एकीकडे अब्दाली सारखी माणसं यंत्रणा, केंद्रात सत्ता अशी सगळी यंत्रणा असता त्यांनी मनसुबा केलाय की उद्धव ठाकरेंची सेना संपवा. पण माझ्यासमोर बसलेली वाघनख आहेत. ती कधी कोथळा बाहेर काढतील हे सांगता येणार नसल्याचेही यावेळी सांगितले.
Marathi e-Batmya