पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबातील वारसांना ५० लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली. तत्पूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विशेष म्हणजे कालच यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेत मागणी केली होती. सुप्रिया सुळे यांनी मागणी केलेल्या तीन मागण्यांपैकी दोन मागण्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आल्या हे विशेष.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबांतील मुलांच्या शिक्षणाकडे, रोजगाराकडे राज्य सरकार लक्ष देणार असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच मृतांपैकी ज्यांच्या कुटुंबात रोजगाराचा प्रश्न आहे, त्यांच्या थेट वारसांना शासकीय नोकरी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या विशेषाधिकारात जाहीर केला. हल्ल्यातील मृतांपैकी जगदाळे यांच्या कुटुंबातील मुलीला नोकरी देण्याचा निर्णय कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला होता.
यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कालच एक पत्रकार परिषद घेत पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियानातील एकास शासकिय नोकरीत घ्यावे आणि मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्याची मागणी केली होती. तसेच मृतांच्या कुटुंबियांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी केली होती.
त्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुप्रिया सुळे यांनी केलेल्या मागणीनुसार पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या कुटुंबियांमधील एकाला शासकिय नोकरीत सामावून घेण्याचा निर्णय घेत, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देणार असल्याचे सांगत त्या सहा जणांच्या कुटुंबियांना ५० लाख रूपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला.
लाईव्ह |📍मुंबई | पत्रकारांशी संवाद | 🗓️28-04-2025
https://t.co/ptxYT9GaLx— Supriya Sule (@supriya_sule) April 28, 2025
Marathi e-Batmya