जिवंत अभिनेत्री सोनाली बेंद्रेला राम कदमांकडून श्रध्दांजली आमदार कदमचा आणखी एक नवा प्रताप

मुंबई : प्रतिनिधी

हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सोनाली बेंद्रे हीच्यावर सध्या अमेरिकेत उपचार सुरु असताना तिला ट्वीटरवरून चक्क श्रध्दांजली वाहण्याचा नवा पराक्रम भाजपचे आमदार राम कदम यांनी केला. दोन दिवसापूर्वी महिलांविषयी अवमानकारक वक्तव्यामुळे सामाजिक आणि राजकियस्तरावर चांगलेच पडसाद उमटले. त्यानंतर कदम यांनी जिवंत अभिनेत्रीलाच श्रध्दांजली वाहील्याने राम कदम पुन्हा चर्चेत आले आहेत.

अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांना कँन्सर असून त्यावर अमेरिकेत उपचार सुरु आहेत. तसेच त्यांच्या तब्येतीत सुधारणाही होत आहे. तरीही राम कदम यांनी त्यांचे निधन झाल्याचे जाहीर करत त्यांना श्रध्दांजली वाहून मोकळे झाले आहेत. कदम यांच्या या ट्वीटमुळे त्यांच्यावर पुन्हा एकदा टीकेची झोड उठली आहे.

दरम्यान, चुकीचे ट्वीट केल्याने प्रसारमाध्यमातून टीकेची झोड उठताच राम कदम यांनी केलेले ट्वीट मागे घेत दुसरे ट्वीट करत अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांची प्रकृत्ती सुधारावी यासाठी प्रार्थना केली.

About Editor

Check Also

खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी, मुंबईत ४० टक्केही मॅपिंग झालेले नाही, ते पूर्ण करा

लोकशाही व्यवस्थेत निवडणुका हा एक उत्सव आहे, या उत्सवात सर्वांचा सहभाग असला पाहिजे परंतु एसआयआर मोहिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *