Breaking News

आदित्य ठाकरे यांची मागणी, CET परिक्षा घोटाळयाची चौकशी करा परिक्षा पेपर मध्ये ५४ चुका विध्यार्थ्यांची उत्तर पत्रिका, मार्क जाहीर करा

सध्या देशात एनईईटी परिक्षेच्या पेपर लीक आणि मिळालेल्या मार्किंग वरून संबध देशभरात गदारोळ सुरु आहे. त्यातच या परिक्षेवरून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असून जवळपास १५ हून अधिक विद्यार्थ्यांनी एनटीए परिक्षा पध्दतीविरोधात न्यायालयात दादही मागण्यात आली आहे. त्यातच आता नीट परिक्षेतही अशाच पध्दतीचा गोंधळ सुरु झाल्याने सीईटी परिक्षेत ५४ चुका असून या परिक्षा घोटाळ्याची चौकशी सुरु करा अशी मागणी शिवसेना उबाठा युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली.

यावेळी शिवसेना उबाठा गटाचे दक्षिण मध्य मुंबईचे खासदार अनिल देसाई हे ही यावेळी उपस्थित होते.

आदित्य ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, नीट सारखा राज्यातील सीईटी परीक्षा गोंधळाबाबत चौकशीची मागणी केलीय. पैसा कामविण्यासाठी सीईटी परीक्षा घेतली आहे का ? असा सवाल केला. तसेच राज्य सरकारच्या नोकर भरतीवर हल्लाबोल करत पोलीस भरती सुरु झालीय. त्यात ही गोधळं आणि विध्यार्थी आंदोलन सुरु आहे. पावसात पोलीस भरती कशी करता असा सवालही यावेळी केला.

पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, सीईटी परिक्षा २४ बॅचेस मध्ये घेतला गेला जो एकच पेपर होता. प्रश्न वेगळे होते. ऑबजेक्शन घेण्यासाठी १ हजार रुपये घेतात. १४२५ ऑबजेक्शन या परिक्षा मध्ये घेतले आहेत. म्हणजे सीईटी सेलने किती पैसे कमवले. आता या एकूण परीक्षेत ५४ चुका समोर आल्या आहेत… मग सीईटी सेलच्या आयुक्तांना का ठेवलं आहे असा सवालही यावेळी उपस्थित केला.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, ५४ चुका या CET सेलने केल्या आहेत. उत्तर पत्रिका सुद्धा तीन दिवसात गायब होते. आता गुण येत नाही, पर्सेंटाईल येतात.. ते पण सगळं वेगवेगळ्या पद्धतीने दिले आहेत. आता यावर उत्तर म्हणून CET सेल म्हणत काही पेपर कठीण होते काही सोपे होते हे तुम्हीच ठरवल कस हे ही सांगा. तुम्ही आन्सरशिट का देत नाहीत?, का लपवताय का पारदर्शकता का नाहीये? प्रत्येक बॅच मध्ये टॉपर कोण? हे कळत नाहीय. विद्यार्थ्यांचे गुण एक सारखे आणि परसेंटेईल वेगवेगळे असल्याची टीकाही यावेळी केली.

शेवटी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, पुन्हा परीक्षा घेऊ नका, जे ऑब्जेक्शन घेण्यात आले, त्यावर आता ज्यांनी पैसे दिले ते सीईटी सेलने विद्यार्थ्यांना परत करावे. एक तर CET सेलने गुण जाहीर करावेत. विद्यार्थ्यांचे पैसे जे ऑब्जेजक्शन साठी घेतले ते परत करावेत. प्रत्येक बॅच चा टॉपर समोर आणावा, मेरिट समोर आणावा.. परिक्षेची उत्तर पत्रिका समोर आणावी, जोपर्यत हा गोंधळ सुटत नाही, तोपर्यंत अभियांत्रिकी प्रवेशाला स्थगिती द्यावी अशा मागण्याही राज्य सरकारकडे केल्या.

Check Also

पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचे न्यायिक काम परभणीतून

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण व गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच हिंगोली स्वतंत्र न्यायिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *