दुप्पट फौजफाटा बोलावत मारकडवाडी ग्रामस्थांवर प्रशासनाचा दबावः मतदान स्थगित मात्र निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा आणि आंदोलन करणार

सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी येथे विधानसभा निवडणूकीत मतदाना दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारापेक्षा भाजपाच्या उमेदवाराला पडलेली मते जास्त होती. त्यामुळे ईव्हीएममधून इतक्या मोठ्या प्रमाणावर ही मते पडलीच कशी असा सवाल करत मारकडवाडी गावातील ग्रामस्थांनी ठराव करत स्वतःच्या पैशातून मतपत्रिकेवर पुन्हा निवडणूक घेणार असल्याचे जाहिर केले. मात्र स्थानिक प्रशासनाने आणि ग्रामस्थानांवर दुपटीने पोलिसांचा दबाव आणत मतदानाची प्रक्रिया स्थगित करण्यास भाग पाडल्याचे सांगितले जात होते.

मारकडवाडी ग्रामस्थानी आधीच जाहिर केल्याप्रमाणे आज मतपत्रिकेवर आधारीत मतदानाची प्रक्रिया पार पाडणार असल्याचे जाहिर केले. तसेच यासंदर्भात स्थानिक प्रशासनाला मतदानाच्या अनुषंगाने पत्र देत त्यासाठी होणाऱ्या खर्चाची रक्कमही गावकऱ्यांनी स्वखर्चातून गोळा केली होती.

मात्र माळशिरस तालुक्याच्या तहसीलदारांनी मतदानाची प्रक्रिया आणि मतदान फक्त निवडणूक आयोगाकडूनच घेतले जाऊ शकते असे सांगत गावकऱ्यांना ही प्रक्रिया पार पाडण्यास मनाई केले. तरीही मारकडवाडी ग्रामस्थांनी मतदानाची प्रक्रिया पार पाडणारच असा निर्धार व्यक्त केला. त्यावर पुन्हा स्थानिक प्रशासनाने जर गावकऱ्यांनी तरीही मतदानाची प्रक्रिया पार पाडली तर सर्व गावकऱ्यांच्या विरोधात पोलिसात गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला. त्यावर पोलिसांकडूनही तशी तयारी करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी जाहिर केलेल्या मतदाना दिवस उजाडला. त्यानंतर गावकऱ्यांनी मतपत्रिकेवर मतदान करण्याचा निर्णय जाहिर केल्याप्रमाणे जमण्यास सुरुवात केली. मात्र प्रशासनांने गावकऱ्यांच्या लोकसंख्येपेक्षा दुपटीने फौज फाटा गावात बोलावला. यावेळी पोलिस प्रशासनाकडून गावात कलम १४४ लागू केले असून गावकऱ्यांशी चर्चा करून प्रशासनाच्या मान्यतेशिवाय मतदानाची प्रक्रिया जर पार पा़डली. तर सर्व गावकऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील आणि अटक करणार असल्याचा इशारा दिला.

त्यानंतर ग्रामस्थांनी मतदान घेण्याची प्रक्रिया स्थगित केली. मात्र माळशिरसचे नव निर्वाचित आमदार उत्तमराव जानकर यांनी, निवडणूक आयोगाच्या आणि ईव्हीएम मशिन्सच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिला. त्यावर स्थानिक ग्रामस्थांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात आणि ईव्हीएम मशिन्सच्या विरोधात आंदोलन करण्यात आल्याचे सांगितले.

दरम्यान, अॅड असीम सरोदे म्हणाले की, मारकडवाडीतील गावकऱ्यांनी ईव्हीएम मशिन्सच्या मतदान प्रक्रियेवर नाराजी दाखवत मतपत्रिकेवर लोकशाही प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. मात्र प्रशासनाने पोलिसांचा मोठ्या प्रमाणावर फौज फाटा मागवून गावकऱ्यांवर अप्रत्यक्ष दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र प्रशासनाने गावकऱ्यांनी स्वंयस्पूर्तीने लोकशाहीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याचा परिणाम विद्यमान विधानसभेच्या निकालावर होणार नसताना अशा पद्धतीने गावकऱ्यांना दबाव आणणे योग्य नसल्याचे मतही यावेळी व्यक्त केले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, काँग्रेसच्या नगरपालिका, नगरपंचायत उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण शिबिर पहिल्या टप्प्यात कोकण विभागातील तीन दिवसीय निवासी शिबिर २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी चिपळूणमध्ये

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकांमधील काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *