नागपूरातील हिंसक प्रकरणानंतर औरंगजेबाची कबर आता नो ड्रोन झोन सोशल मिडीयावरील आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याच्या विरोधात पोलिस करणार कारवाई

मुघल शासक औरंगजेबाची कबर उघडून फेकून द्या म्हणून दोनच दिवसांपूर्वी नागपूरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. त्याचे पडसाद त्याच रात्री उमटत हिंसाचाराची घटना घडली. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील मुघल शासक औरंगजेबाची कबर “नो ड्रोन” झोन म्हणून छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी घोषित केल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

सोशल मीडियावर, पोलिस या प्रकरणावरील “आक्षेपार्ह” पोस्ट शोधण्यात आणि त्या हटवण्यात व्यस्त आहेत, असे दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले. आतापर्यंत अशा ५०० हून अधिक ऑनलाइन पोस्ट हटवण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

जिल्हा मुख्यालयापासून सुमारे २५ किमी अंतरावर असलेल्या खुलताबाद शहरात औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी राज्यभर निदर्शने करण्यात आली आणि अनेक राजकारण्यांनीही या आवाहनाला पाठिंबा दिला. या निषेधा पोस्टरमुळेच सोमवारी नागपुरात हिंसाचार उसळला.

जिल्हा प्रशासनाने हा परिसर “नो ड्रोन” झोन म्हणून घोषित केला आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राज्यात राज्य राखीव पोलिस दलाची एक कंपनी आणि ५० इतर कर्मचारी तैनात करण्यात आले आल्याचेही यावेळी सांगितले.

मंगळवारी आर्कियोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियन-प्रोटेक्टेड साइटला भेट देणारे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पत्रकारांना सांगितले की, कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि जर त्यांना या प्रकरणाबाबत काही माहिती असेल तर लोकांनी प्रशासन किंवा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहनही यावेळी केले.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर शहरात सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रक्षोभक पोस्ट ट्रॅक करण्यासाठी आणि त्या हटविण्यासाठी दहा पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे पथक रात्रंदिवस काम करत आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यानी सांगितले.

सायबर पोलिस निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, “आलमगीर आणि औरंगजेब हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे. अशा पोस्ट आणि त्यांच्याशी संबंधित आक्षेपार्ह टिप्पण्या तपासण्यासाठी आम्ही हे हॅशटॅग वापरत आहोत.”

अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांनी आतापर्यंत विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून ५०६ पोस्ट काढून टाकल्या आहेत आणि ८० हून अधिक व्यक्तींना ऑनलाइन प्रक्षोभक सामग्री पोस्ट करण्यापासून परावृत्त करण्याचा इशारा दिला आहे. “पण आतापासून, आम्ही आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे नोंदवू,” असेही शेवटी बोलताना सांगितले.

About Editor

Check Also

छगन भुजबळ यांची माहिती, राज्यातील हॉटेल, उपहारगृहांसाठी आता २० टक्के अतिरिक्त गॅस पुरवठा होणार व्यापारी एलपीजीच्या (Commercial LPG) वाटपाबाबत केंद्राच्या निर्देशामुळे हॉटेल चालकांना मिळणार दिलासा

राज्यातील हॉटेल, ढाबे, उपहारगृहे तसेच औद्योगिक कॅन्टीन आणि अन्न प्रक्रिया-दुग्धव्यवसाय क्षेत्रासाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *