Breaking News

अजित पवार यांचे प्रत्युत्तर,… माझ्या अंगाला काही छिद्रं पडत नाहीत तानाजी सावंत आणि भाजपाच्या गणेश हाके यांनी केलेल्या टीकेवर व्यक्त केले मत

मागील दोन अडीच वर्षापासून राज्यातील महायुती सरकारचा कारभार विनाविघ्न आणि कुरबुरीविना सुरु असल्याचा देखावा किंवा राजकिय गरज म्हणून तसे चित्र राज्याच्या राजकारणात दाखविण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर आता राज्यात विधानसभा निवडणूकीचा कालावधी जवळ येत असल्याच्या पार्श्वभूमीवर महायुतीतच सहकारी पक्षांच्या नेत्यांवर आरोप-प्रत्यारोपाची नवी खेळी आता नव्याने महायुती सरकारकडून सुरु झाली आहे. कालपर्यंत मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाचे मंत्री डॉ तानाजी सावंत यांनी अजित पवार यांच्यावर टीका करून एकच राळ उडवून दिली. त्यानंतर आज भाजपाचे प्रवक्त गणेश हाके यांनीही आता अजित पवार यांच्यावर टीका करून एकच अजित पवार यांच्यावरील टीकेत भाजपाही मागे नसल्याचे दाखवून दिले. या टीकेवरून अजित पवार यांनी मोजक्या शब्दात प्रत्युत्तर देत शिंदे गटाच्या नेत्याला आणि भाजपाच्या नेत्याला शून्यावर बाद करून टाकले.

मुख्यमंत्री शिंदे गटाचे आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत अजित पवार यांच्यावर टीका करताना म्हणाले की, मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही सगळे एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसतो. मात्र अजित पवार यांच्यासोबत बसल्यानंतर मला उलटी केली असे सांगत टीका केली. तसेच मी एक शिवसैनिक असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत युती करण्याचा कधीही विचार करू शकत नाही, खरा शिवसैनिक काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणे कदापी सहन करणार नाही असेही सांगितले.

तर भाजपाचे गणेश हाके म्हणाले की, अजित पवार यांच्यासोबतची युती म्हणजे असंगाशी संग केल्याची टीका केली.

त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता, अजित पवार यांनी अधिक मोजक्या शब्दात या टीकाकारांना प्रत्युत्तर दिले.
अजित पवार यावेळी म्हणाले की, कोणी कोणावर काय बोलले, कुणी टीका केली यावर मी जास्त बोलायचे नाही असे ठरवले आहे. मात्र कुणाला उलट्या झाल्या, कोणी असंगाशी संग असे म्हणून जरी टीका केली. तरी त्यांच्यावर टीका करून प्रत्युत्तर न देण्याचे मी ठरविले आहे. तसेच कोणी काही बोलले म्हणून माझ्या अंगाला छिद्र पडत नाहीत असे सांगत टीकाकारांना एका फटक्यात निरूत्तुर केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत