Breaking News

अजित पवार यांच्या हस्ते, महा – राष्ट्रवादी व्हॉटसअप हेल्पलाईन’ उपक्रमाचे उद्घाटन भ्रष्टाचाराबाबतही तक्रारी करता येणार

राज्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे त्यामध्ये विशेषतः महिला वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘महा – राष्ट्रवादी व्हॉटसअप हेल्पलाईन’ हा नवीन उपक्रम तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांपर्यंत जलदगतीने पोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे हा उपक्रम राज्यातील महिलांसाठी जीवनदायी ठरणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसने सुरु केलेल्या जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने २२ मतदारसंघात पोचलो. राहिलेल्या मतदारसंघात जाण्याचे नियोजन आहे. या यात्रेत आम्हाला लोकांकडून विशेषतः महिलांचे प्रेम आणि पाठिंबा मिळाला आणि तो अभूतपूर्व असा होता. या यात्रेत जाताना सर्वात लोकप्रिय ठरलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, ‘मोफत तीन गॅस सिलेंडर’ व’ शेतकऱ्यांसाठी मोफत वीज’ या योजनांना उत्स्फूर्त प्रतिसाद आणि लोकप्रियता मिळाली आहे असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, सर्व लाभार्थ्यांना लाभ कोणत्याही अडचणीशिवाय मिळावेत याची खात्री करण्यासाठी आम्ही ‘महा – राष्ट्रवादी व्हॉटसअप हेल्पलाईन’ हा उपक्रम सुरू करत आहोत. या हेल्पलाईनसाठी- ९८६१७१७१७१ या क्रमांकावर चांद्यापासून बांद्यापर्यंत याचा लाभ घेता येणार आहे. अनेक शासकीय योजना असतात परंतु त्या लोकांपर्यंत पोचत नाहीत. ज्यांना लाभ मिळायला हवा त्यांना मिळत नाही. त्या योजना उपलब्ध आहेत की नाही हे पण कळत नाही. योजनांसाठी जाहिरात करतो परंतु त्या योजनेतील बारकावे सर्व लोकांना समजतात असे नाही. त्यासाठी हा प्रयत्न आम्ही करत आहोत असेही सांगितले.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, आमच्या व्हॉटसअप नंबरवर एक संदेश पाठवायचा आहे. त्यावर तीन भाषा उपलब्ध असतील. तिथे तुमच्या गरजेनुसार मार्गदर्शन किंवा तक्रार नोंदवण्यास मदत होणार आहे. त्यामध्ये प्रत्येकजण डिजिटलदृष्टया साक्षर नसू शकतो किंवा हा क्रमांक वापरण्यास सक्षम नसेल अशा लोकांसाठी त्याठिकाणी आमचे कार्यकर्ते घरात जाऊन मदत करतील. यावेळी प्रत्येक घरावर हेल्पलाईनचा नंबर असलेला स्टीकर लावण्याचा संकल्प केलेला आहे. त्यामुळे प्रत्येकाला लाभ आणि मदत मिळण्यासाठी आवश्यक ती माहिती यामध्ये मिळेल असा विश्वास व्यक्त केला.

अजित पवार म्हणाले की, या उपक्रमात भ्रष्टाचाराबाबत तक्रार करण्यास संधी मिळणार आहे. ज्यामुळे पारदर्शकता जबाबदारी सुनिश्चित होणार आहे. उपमुख्यमंत्री कार्यालयातही एक डेस्क स्थापन करण्यात आली आहे. यात राज्यातून येणाऱ्या प्रतिक्रियांचे दररोज संध्याकाळी पुनर्वलोकन करणार आहोत. राज्याला विभागात आणि मतदारसंघात विभागण्यात आले आहे जेणेकरुन तक्रारीचे निराकरण कमीत कमी २४ तासात आणि जास्तीत जास्त ४८ तासाच्या आत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कोणत्याही जाहिरातीशिवाय आम्हाला बारा दिवसात जवळपास ६० हजार अधिक समस्या मिळाल्या त्यापैकी १० हजार समस्यांचे निराकरण करण्यात आले आहे. उर्वरित समस्यांवर आमचं काम सुरू आहे. लोकांशी थेट संवाद साधण्यासाठी मी आणि प्रदेशाध्यक्ष तटकरे कटिबद्ध आहोत असेही सांगितले.

आज उपक्रमाची कार्यक्षमतेने अंमलबजावणी करण्याचे काम कार्यकर्त्यांवर सोपवण्यात आले आहे. याशिवाय आम्ही दररोज साधारण ५० हजार समस्या हाताळण्याची क्षमता असणारे कॉल सेंटर स्थापन करतोय. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्याचे आमचे टार्गेट आहे. यामधून लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे लाभ मिळावेत ही यामागची कल्पना आहे आणि भूमिका आहे हेही अजित पवार यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, आमदार मनोहर चंद्रीकापुरे, प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, आमदार राजेश विटेकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश प्रवक्ते ताराचंद म्हस्के, मुकेश गांधी, अजित यशवंतराव, मुजीब रुमाणे, प्रशांत पवार, सना मलिक, आदी उपस्थित होते.

Check Also

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची व्यवस्थापन समिती माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची माहिती

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती माजी केंद्रीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *