राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थानापन्न होण्यापूर्वी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन होण्यासाठी गौतम अदानी आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. तसेच शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच त्यावेळी सरकार स्थापन करण्यात आले. तसेच यासंदर्भात गौतम अदानी यांच्या घरी शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. तसेच त्या बैठकीला अमित शाह हे ही उपस्थित होते असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी एका युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत केला.
तसेच पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, आमचे वरिष्ठ नेते जसं सांगतात तसे आम्ही करत होतो. २०१९ च्या घटनेला ५ वर्षे पूर्ण झाली. सर्वांना माहितेय की त्या संदर्भातील बैठक कुठे झाली. दिल्लीत कोणत्या उद्योगपतीच्या घरी बैठक झाली. पण आता जे झालं ते झालं. मी पुन्हा सांगतो अमित शाह, गौतम अदानी, प्रफुल पटेल, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शरद पवार हे सगळे त्या बैठकीला उपस्थित होते.
दरम्यान शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत अजित पवार यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर उत्तर देताना म्हणाले की, आमची चर्चा झाली असती तर आमचे सरकार आलेले पाह्यला मिळाले असते, पण त्यातील एकही गोष्ट सत्यात उतरलेली दिसत नाही. त्यामुळे अशा प्रश्नांना काही अर्थ नाही. ही गोष्ट खरी की निवडणूका आणि तो कालावधी सोडला तर केंद्रातले मंत्री आणि उद्योगपती भेटत नाहीत. असे मी म्हणालो नाही. ही गोष्ट खरी आहे की, अनेक वेळेला अजित पवार यांना घेऊन मी अदानींची भेट घेतली आहे. त्यांना अधिक माहिती मिळावी हा हेतू होता.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत. त्यांना एकदा नाही तर तीन-तीन वेळा मी भेटलो. महाराष्ट्राच्या ऊसासंदर्भात काही प्रश्न होते. त्यासंबधी त्यांना भेटलो. मी संसदेचा प्रतिनिधी आहे. त्यामुळे विषयासंदर्भात भेट घेणे आवश्यक आहे. वास्तवातून वेगळा अर्थ काढता कामा नये. तसेच वास्तवात घडले का सरकार स्थापन झाले का हे झाले नसेल तर प्रश्नांची चर्चा करण्यात अर्थ नाही असेही यावेळी सांगितले.
Marathi e-Batmya