अजित पवार धमकी प्रकरण, रोहित पवार, अमोल मिटकरी धावले मदतीला काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांची मात्र टीका

काही वर्षांपूर्वी राज्यातील पाण्याच्या प्रश्नावरून केलेल्या वक्तव्यावरून काही महिन्यांचा राजकीय विजनवासात काढावे लागल्यानंतर आता पुन्हा एकदा अजित पवार यांनी सोलापूरमधील कुर्डुवाडीतील कार्यकर्त्याला वाचविण्यासाठी थेट महिला पोलिस अधिकाऱ्यालाच धमकी दिल्याचे प्रकरण चांगलेच अंगलट येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर अजित पवार यांचे धमकावण्याचे प्रकरण योग्य असल्याचे दाखवून देण्यासाठी त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरी नामक प्रवक्त्याने थेट केंद्रीय लोकसेवा आयोगाला पत्र लिहित आयपीएस अधिकारी आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा यांची कागदपत्रे तपासण्याची मागणी करत प्रशासकीय अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून येत आहे.

या धमकी प्रकरणावरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार यांच्यासारखा सत्तेचा माज सर्व सत्ताधारी वर्गाला आला असल्याची टीका केली. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवर टिव्ट करत राज्यात शेतकरी कर्जमाफी, अवकाळी पावसाने झालेलं नुकसान असे अनेक प्रश्न आहेत, पण त्यावर चर्चा होण्याऐवजी सध्या करमाळा येथील महिला पोलिस अधिकारी आणि अजितदादा यांच्यातील संभाषणाचीच अधिक चर्चा होताना दिसते. वास्तविक अजितदादा सहज बोलले तरी ते रागावले, संतापले असं त्यांना भेटणाऱ्या नवख्या माणसाला वाटतं. पण अजितदादांची कार्यपद्धती, स्वभाव आणि स्पष्टवक्तेपणा गेली ३५-४० वर्षे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे.
करमाळा प्रकरणात संबंधित महिला अधिकाऱ्याचीही कोणतीही चूक नाही. पण अजितदादांच्या फोन कॉलमधील संभाषणाला जाणीवपूर्वक वेगळं वळण देऊन मित्रपक्षांकडूनच टार्गेट करण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसतं. आम्ही विरोधात असलो तरी माझा स्वभाव हा कायम खऱ्याला खरं म्हणण्याचा आहे, त्यामुळं आपल्याच मित्रांकडून कसा सापळा रचला जातो, हेही अजितदादांनी यानिमित्ताने लक्षात घ्यायला हवं. आम्ही मात्र नको त्या वादात तेल न घालता खऱ्या प्रश्नांकडं सरकारचं लक्ष वेधत राहू असे सांगत अजित पवार यांची एकप्रकारे पाठराखण केली आहे.

वास्तविक पाहता काही महिन्यांपूर्वी अजित पवार गटाकडून जाणीवपूर्वक एकनाथ शिंदे आणि त्याचा गट कसा राजकियरित्या असल्याच्या वावड्या जाणीवपूर्वक उठविण्यात येत होत्या आणि त्यांचा गट कसा निरूत्साही झाला असल्याची अनेक रसभरत वर्णन केली जात होती. तर एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून अजित पवार यांचा पक्ष आणि गट कसे पूर्णाधिकार सत्तेसाठी तडफडत आहेत अशी कुचेष्टा करत असल्याचे मंत्रालयात आणि मंत्रालयीन वर्तुळात नेहमीच चर्चेला जात आहेत. तर भाजपा समर्थक अनेक अधिकारी आणि भाजपाचे कार्यकर्त्ये अजित पवार यांच्याबाबत बोलताना एखाद्या घरगड्यासारखा रोज सकाळी काम करायला येत असल्याची खोचक टीपण्ण खाजगीत व्यक्त करत आहेत. तसेच एखाद्या कामाच्या अॅडव्हान्स आणि नंतरची एकेरी टक्का कसा घेतला जातो याचेही रसभरीत वर्णनेही भाजपाच्या लोकांकडून नीट चर्चेली जात असल्याचेही अनेकदा मंत्रालयात चर्चेली जात आहेत.

परंतु सोलापूरात उपअधिक्षक अंजली कृष्णा या गरीबीतून पुढे आलेल्या आहेत. तसेच त्यांचे पालकही पूर्वीप्रमाणे त्यांच्या एक छोटेखानी व्यवसाय करत असल्याचे समजते. मग अशा नाजून परिस्थितीतून पुढे आलेल्या अंजली कृष्णा यांना ज्या युपीएससी परिक्षेतून उत्तीर्ण होऊन पहिल्याच पोस्टींगवर सोलापूरात आलेल्या आहेत. मग अशा पहिल्याच पोस्टींगवर आलेल्या अंजली कृष्णा यांना एका बेकायदेशीर काम करणाऱ्या कार्यकर्त्यासाठी धमकावणाऱ्या महिला अधिकाऱ्याबाबत अजित पवार यांनी अशा पद्धतीनी वागणे हे योग्य आहे का असा सवाल या निमित्ताने निर्माण होत आहे. यासंपूर्ण प्रकरणावरून अजित पवार यांना भाजपा शिंदे गटाचा वाण नाही पण गुण लागल्याचे यातून दिसून येत आहे.

About Editor

Check Also

माणगाव, तळा व म्हसळातील आदिवासी लाभार्थ्यांसाठी घरकुलासाठीचा प्रस्ताव सादर करा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आदेश

माणगाव, तळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना आदिवासी घरकुल योजना (शहरी) अंतर्गत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *