Breaking News

बांग्लादेशातील परिस्थितीबाबत भारतातील सर्वपक्षिय नेत्यांची बैठक पार पडली १२००० ते १३००० भारतीयांना बाहेर काढण्याची आवश्यकता पण बांग्लादेशातील परिस्थिती चिंताजनक नाही-एस जयशंकर

बांग्लादेशातील विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनामुळे माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज भारतातील सर्वपक्षिय नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संबोधित करताना म्हणाले की, हिंसाचारग्रस्त देशातील १२,०००-१३,००० भारतीयांना बाहेर काढण्याची आवश्यकता पण बांग्लादेशातील परिस्थिती चिंताजनक नाही, असे सूत्रांनी सांगितले.

सर्वपक्षीय बैठकीत एस जयशंकर म्हणाले की, बांग्लादेशातील सरकारविरोधी निदर्शने आणि त्यात ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्यामुळे शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडल्यानंतर सरकार बांग्लादेशातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

या सर्वपक्षिय नेत्यांच्या बैठकीला दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षांचे नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह एनडीएचे सर्व मित्रपक्ष आणि बहुतांश विरोधी पक्षाचे नेते उपस्थित होते. मात्र, या सर्वपक्षिय बैठकीचे निमंत्रण दिले नसल्याचा दावा ‘आप’ने केला.

मंत्री एस जयशंकर म्हणाले की, सुमारे ८,००० भारतीय, बहुतांषकरून विद्यार्थी, सरकारी नोकऱ्यांसाठी विवादास्पद कोटा प्रणालीच्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर भारतात परतले आहेत.
एस जयशंकर म्हणाले की, पंतप्रधान पदाचा राजीनामा देणाऱ्या आणि सोमवारी भारतात पळून गेलेल्या शेख हसीना यांच्याशी सरकारने थोडक्यात चर्चा केली. सरकारला शेख हसीनाला त्यांची भविष्यातील योजना ठरवण्यासाठी थोडा वेळ द्यायचा आहे.

काँग्रेसचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी म्हणाले की, एक मध्यम आणि दीर्घकालीन रणनीती असली पाहिजे, ज्यामध्ये बांग्लादेशमध्ये निवडणुका होईपर्यंत अंतरिम सरकारचे शासन असेल. नोबेल पारितोषिक विजेते डॉ मुहम्मद युनूस यांना सरकारचे मुख्य सल्लागार करण्याची मागणी विद्यार्थी आंदोलकांनी केली आहे.

यावर एस जयशंकर म्हणाले की परिस्थिती “चिंताजनक आणि विकसित” आहे. बांग्लादेशातील भारतविरोधी भावनांवर जयशंकर म्हणाले, ते काही ठिकाणी दिसले आहे, परंतु जे सरकार येईल ते भारताशी चांगला व्यवहार करेल अशी आशा आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला शेख हसीना यांनी सलग चौथ्यांदा सत्तेवर आल्यानंतर, बांग्लादेशमध्ये ‘इंडिया आउट’ मोहिमेला वेग आला, कार्यकर्त्यांच्या एका भागाने भारतावर शेजारच्या राजकारणात हस्तक्षेप केल्याचा आरोप केला.

बैठकीनंतर शिवसेना उबाठा पक्षाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या की, बांग्लादेशमध्ये जे काही घडत आहे, त्याचा भारतावरही परिणाम होईल. बांग्लादेश हे आमचे सीमावर्ती राष्ट्र आहे… बांग्लादेशमध्ये अराजकता निर्माण झाली तर ते भारतासाठी चांगले होणार नाही. तेथील भारतीयांना कसे परत आणता येईल आणि सीमा कशा सुरक्षित करता येतील, हे सरकारने पाहिले पाहिजे. अशी भूमिका मांडली.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *