बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याऱ्यांना अटक करा आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय द्या या प्रमुख मागणीसाठी आज मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड यांना अटक करा या मागणीसाठी आज सर्वपक्षिय मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, स्थानिक खासदार बजरंग सोनावणे, भाजपा आमदार सुरेश धस, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजीराजे आदीजण सहभागी झाले होते. तसेच या मोर्चात संतोष देशमुख यांची मुलगीही सहभाग झाली होती. या मोर्चाला मोठ्या प्रमाणावर स्थानिक नागरिक सहभागी झाले.
यावेळी मोर्चाला संबोधित करताना खासदार बजरंग सोनावणे म्हणाले की, बीडमध्ये जी काही दहशत निर्माण झाली आहे, ती दहशत मोडून काढण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ही दोन कोटी रूपयांच्या खंडणीवरून झालेली हत्या आहे. ज्या दोन कोटी रूपयांची खंडणी मागतली गेली त्याची तक्रार संतोष देशमुख यांच्याकडे आली होती. त्यामुळे प्रकरणाची तक्रार संतोष देशमुख यांनी पोलिसात केली. याचा राग मनात ठेवूनच ही हत्या करण्यात आल्याचेही यावेळी सांगितले.
पुढे बोलताना खासदार बजरंग सोनावणे म्हणाले की, या घटनेला १९ दिवस झाले तरी पोलिसांना मारेकरी सापडत नाहीत म्हणजे आश्चर्यच असल्याची टीकाही पोलिस यंत्रणेवर केली. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना जोपर्यंत अटक केली जात नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नसल्याचा इशाराही यावेळी दिला.
यावेळी भाजपाचे आमदार सुरेश धसही म्हणाले की, धनंजय मुंडे आणि त्यांचा साथीदार वाल्मिकी कराड यांनी अनेक गायरान जमिनी या बळकावल्या असून तेथील वीट भट्याही अनधिकृतरित्या याच दोघांनी सुरु केल्या आहेत. तसेच येथील औष्णिक वीज केंद्राची राखही या लोकांनी सोडली नसून शस्त्राचा दाख दाखवून इथली राख नेऊन विकून खाली असल्याचा आरोपही यावेळी केला.
पुढे धस बोलताना म्हणाले की, राज्याच्या मंत्रिमंडळात धनंजय मुंडे असल्यावर या प्रकरणाचा तपास काय पूर्ण होतो अशी शंका उपस्थित करत ते आणि त्यांचे बगलबच्चे यांच्या विरोधातील एसआयटी चौकशी त्यांच्या एका इशाऱ्या सरशी थांबणार आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांची हकालपट्टी करा आणि त्याच्या विरोधात वाल्मिकी कराडसह ३०२ चे गुन्हे दाखल करा अशी मागणीही यावेळी केली. त्याचबरोबर पुढे बोलताना धस म्हणाले की, कोण जर जमिन खरेदी करत असेल त्या जमिनीचे कुलमुख्तार पत्र कोणी कोणाला देत का पण आका ने त्यांच्या विश्वासू माणसाला अर्थात वाल्मिकी कराडला दिले असा आरोपही केला. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांना एक सवाल करत २२ डिसेंबरला पंकजा मुंडे या संभाजीनगरहून विमानाने बाहेर गेल्या. मात्र त्याच्या अगोदर तुम्ही संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना का भेटला नाहीत असा सवालही यावेळी करत याचे उत्तर तुम्हाला द्यावे लागेल असे सांगत सध्या मुंडे यांच्याकडे मारणारेही तेच आणि मार खाणाराही त्यांच्यातच, सत्ताधारीही त्यांच्याचकडे विरोध करणाराही त्यांच्याकडे असा आरोपही यावेळी केला.
दरम्यान यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी बोलताना म्हणाले की, आपण फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो पण ज्या पद्धतीने येथे ज्या घटना गडत आहेत त्या घटना पाहता हा फुले शाहु आंबेडकरांचा महाराष्ट्र इथे राहिला नसल्याचे दिसतेय. त्यामुळे इथली दहशत मोडून काढणे आवश्यक आहे. या मोर्चाच्या निमित्ताने ही जमलेले लोक ही व्यक्त होणारी लोक आहेत. त्यामुळे तुम्हीही व्यक्त झाल्याशिवाय तुमच्या मागे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना तुमच्यामागे उभारणार नाही. त्यामुळे कुणाच्याही गुंडगिरीला बळी पडू नका असे आवाहन करत मारेकऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी मागणीही यावेळी केली.
तर यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आतापर्यंत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी दाखल केलेली केस पण येथील पोलिस प्रशासन घेत नव्हते. कारण संतोष देशमुख हे मराठा होते. पण त्यांच्या मारेकऱ्यांनाही अटक अद्याप करण्यात आली नाही. त्यामुळे या हत्येच्या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्याविरोधात कडक कायदेशीर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे अशी मागणीही यावेळी केली. तसेच राज्यात जिल्ह्या जिल्ह्यांमधून संतोष देशमुख यांच्या मारकेऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे म्हणून मोर्चे काढा असे आवाहनही यावेळी केले.
तसेच या मोर्चात आवर्जून उपस्थित राहिलेले स्वराज्य पक्षाचे संभाजीराजे म्हणाले की, शिवाजी महाराजांचे नाव घेता आणि महाराष्ट्राचा बिहार करायला निघालात का असा सवाल करत जर सरकार बीडचे पालकमत्री पद धनंजय मुंडे यांना देणार असेल तर बीडच्या पालकत्वाची जबाबदारी मी घेतो असे सांगत निवडणूकीच्या काळात मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले होते की, उद्या भाजपाचे सरकार आले तर बीडच्या धनंजय मुंडे यांना मंत्री करू नका असे मी सांगितले होते. तरीही जर राज्य सरकार धनंजय मुंडे यांची हकाल पट्टी न करता त्यांनाच मंत्री पदी नेमणार असेल मी पालकत्व घ्यायला तयार असल्याचेही यावेळी जाहिर केले.
Marathi e-Batmya