तर मुख्यमत्री शिंदे बरसले, तुमच्या चिठ्या काढेन विरोधकांच्या आरोपावर दिली धमकी

नव्याने राज्यात स्थानापन्न झालेल्या शिंदे-फडणीस सरकारचे पावसाळी अधिवेशन पहिलेच असूनही महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी चांगलेच घेरले. त्यामुळे पावसाळी अधिवेशन चांगलेच रंगतदार झाल्याचे दिसून येत आहे. मात्र विरोधकांच्या सततच्या प्रश्नाच्या भडीमारामुळे थोडेसे गांगरलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज थेट विधानसभेत विरोधकांना सूचक इशारा देत म्हणाले, मी तुमच्यासोबतही काम केले आहे. त्यामुळे मला तुमचं माहित आहे. त्यामुळे तुमच्या चिठ्या काढेन, तशी वेळ माझ्यावर येवू देऊ नका असा गर्भित धमकीवजा इशारा दिला.

त्यामुळे सभागृहातील अनेक आमदार मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने चांगलेच आवाक झाले.

विरोधकांनी मांडलेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या मदतीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी २९३ चा प्रस्ताव दाखल केला होता. त्यावर काल रात्री उशीरापर्यंत सभागृहात चर्चा झाली. या चर्चेत विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारने केलेल्या मदतीवरून मोठ्या प्रमाणावर टीकेची झोड उठविली.

त्यास उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, माझ्या डोक्यात अद्यापही मुख्यमंत्री पद शिरलेले नाही. त्यामुळे मी आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय. मी मुख्यमंत्री नव्हतो तेव्हाही काम करत होतो. विरोधी पक्षनेता म्हणून काम करत होतो. तुमच्यासोबत काम केले आहे. त्यामुळे मला तुमच्या सगळ्या गोष्टी माहित असून तुमच्या चिठ्या माझ्याकडे आहेत. तर त्याही चिठ्या मी काढेन असा सूचक शब्दात विरोधकांना इशारा दिला.

कोणत्याही गोष्टीला सहन करण्याची एक सीमा असते. ती सहन करण्याची क्षमता संपली की कोणीही कोणाचे ऐकत नाही असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ती वेळ माझ्यावर येवू देऊ नका. मी काही कोणाला इशारा देत नाही असेही यावेळी स्पष्ट केले.

भुजबळ साहेब छगन भुजबळ यांना उद्देशून मी रात्री ३ वाजेपर्यंत लोकांना भेट होतो. आणि सकाळी ७.३० वाजता मी ब्रिफिंग घेतली. यापूर्वीचे कोणते मुख्यमंत्री इतक्या उशीरा पर्यंत लोकांना भेटत होते. पण मी भेटतोय लोकांची कामे करतोय. मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलंय लोकांची कामे करायची. हे काम करणार सरकार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, भविष्यातील अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता महाराष्ट्राचा २०४७ पर्यंत जगातील महत्त्वपूर्ण प्रादेशिक अर्थव्यवस्थांमध्ये समावेश

पायाभूत सुविधा, नाविन्यपूर्णता, प्रतिभा, स्वच्छ ऊर्जा, सुव्यवस्थित शहरीकरण, तंत्रज्ञान आणि संस्थात्मक विश्वास या घटकांवरून भविष्यातील आर्थिक नेतृत्व निश्चित होणार आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *