बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील फरार ३ आरोपींना लवकरात लवकर अटक करावी. तसेच या घटनेत दोषी असलेल्या सर्वांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात केली.
बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची माहिती आज २८९ अनव्ये दानवे यांनी सभागृहात मांडली.
अंबादास दानवे पुढे बोलताना म्हणाले की, या गंभीर हत्येत राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या जवळचे वाल्मीक कराड यांचा सहभाग असल्याची येथील गावकऱ्यांना शंका आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येत सहभागी सर्व आरोपींना तात्काळ अटक करून वाल्मीक कराड यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही यावेळी परिषद सभागृहात केली.
त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आर्टीफिशल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आरोपींना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
Marathi e-Batmya