Breaking News

स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, उद्धव ठाकरे यांना विश्वासघाताला सामोरे जावे लागलंय पुन्हा मुख्यमंत्री झाल्याशिवाय त्यांच्या वेदना कमी होणार नाहीत

देशातील प्रमुख उद्योगपती असलेल्या मुकेश अंबानीच्या मुलाच्या लग्नासाठी आलेल्या ज्योर्तिमठाचे ४६ वे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी मुंबईतील शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर ज्योर्तिमठाचे ४६ वे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले की, शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांना विश्वासघाताच्या घटनेला सामोरे जावे लागलेय. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होईपर्यंत त्यांच्या वेदना कमी होणार नाहीत असे वक्तव्य केले.

सोमवारी मुंबईत ज्योर्तिमठाचे ४६ वे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, आम्ही हिंदू धर्माचे अनुयायी आहोत आणि पाप (पाप) आणि पुण्य (पवित्र कर्म) यावर विश्वास ठेवतो. सर्वात मोठे पाप म्हणजे विश्वासघात, उद्धव ठाकरे फसवले गेले आहेत.

ज्योर्तिमठाचे ४६ वे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद पुढे बोलताना म्हणाले की, मी त्यांना (उद्धव ठाकरे) सांगितले की त्यांना जो विश्वासघात सहन करावा लागला त्यामुळे आम्हा सर्वांना दुःख झाले आहे. जोपर्यंत ते पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत नाहीत तोपर्यंत आमच्या वेदना कमी होणार नाहीत, असे सांगत फसवणूक करणारी व्यक्ती हिंदू असूच शकत नाही… महाराष्ट्रातील जनता या विश्वासघाताने दुखावली आहे, आणि निवडणूक निकालातूनही हे स्पष्ट झाल्याचे सांगितले.

पुढे बोलताना ज्योर्तिमठाचे ४६ वे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले की, जे लोक त्यांचा नेता निवडतात त्यांचाही हा अनादर आहे. एखादे सरकार त्याच्या कार्यकाळात मोडणे आणि जनतेच्या जनादेशाचा अपमान करणे चुकीचे आहे असेही यावेळी सांगितले.
उल्लेखनीय म्हणजे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० हून अधिक शिवसेना आमदारांसह तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केले होते आणि महाविकास आघाडी (एमव्हीए) सरकार पाडले होते, ज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचाही समावेश होता. शिंदे यांनी भाजपाशी हातमिळवणी केली आणि नवे मुख्यमंत्री झाले. शिवसेनेच्या शिंदे गटाला निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण चिन्ह मिळाले आहे.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीबद्दल विचारले असता शंकराचार्य म्हणाले, ते माझ्याकडे आले आणि त्यांनी प्रणाम केला. आमच्याकडे जो कोणी येईल त्याला आशीर्वाद द्यायचा हा नियम आहे. म्हणून मी त्यांना आशीर्वाद दिला की नरेंद्र मोदी आमचे हितचिंतक आहेत आणि जर त्यांनी चूक केली, तर आम्ही त्याकडे लक्ष वेधतो.

विशेष म्हणजे स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती यांच्यासमवेत १२ जुलै रोजी मुंबईत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला हजेरी लावली होती.

Check Also

उमेद महिला बचतगट अभियानातील बहिणींचे वर्षा शासकीय निवासस्थानी रक्षाबंधन मुख्यमंत्र्यांसाठी एक कोटी राख्यांचा संकल्प, राज्यातील बहिणींची कृतज्ञता

“माझ्या बहिणी राज्याच्या विकासात मोठे योगदान देतात. त्यांना आधार देण्यासाठी जे-जे करता येईल ते करेन. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *