पवार साहेब म्हणतात परिवर्तन आणू, तुम्ही कसलं परिवर्तन आणणार आहात? तुम्ही इतके दिवस सत्तेत होते, मग आता कसं काय परिवर्तन तुम्ही करणार? असा सवाल करत तिसऱ्या आघाडीचे आमदार बच्चू कडू यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना करत परिवर्तनाचा अधिकार महायुतीला नाही आणि आघाडीलाही नाही. परिवर्तनाची भाषा करण्याचा अधिकार आम्हाला आहे. नवीन परिवर्तन हे खऱ्या अर्थानं कामाचं असेल, बजेट मधील हिस्सा हा सामान्य माणसाचा असल्याचे प्रहार पक्षाचे प्रमुख बच्च कडू सांगितले.
राज्यातील सत्ताधारी महायुती विरोधी असलेली महाविकास आघाडी आणि आता निवडणुकीच्या तोंडावर दोघांना आवाहन देणाऱ्या तिसऱ्या आघाडीची बैठक आज पार पडली. या बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे, यांची राज्यसभा सदस्यत्वाची मुदत संपल्यानंतर शिवसेनेच्यावतीने पुन्हा राज्यसभेवर जाण्याची संधी नाकारणारे छ. संभाजीराजे आणि राज्यात माजी राज्यमंत्री असलेले सुरत, गुवाहाटी, गोवा असा प्रवास करून आलेले विद्यमान आमदार बच्चू कडू यांच्या तिसऱ्या आघाडीची बैठक आज संपन्न झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत आमदार बच्चू कडू बोलत होते.
पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले की, सामान्य माणसाला आपलं वाटेल असं सरकार आम्ही स्थापन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्ही चांगले उमेदवार देणार असून या बैठकीत १५० जागा लढविण्या बाबतचा निर्णय घेण्यात आला. लवकरच इतर जागांवर निर्णय घेण्यात येणार आहे. बरेच लोक आमच्याकडे येण्यास इच्छुक असल्याची माहिती परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी दिली आहे. एकनाथ शिंदे असो की देवेंद्र फडणीस यांच्या विरोधात देखील उमेदवार देणार असल्याचेही यावेळी बच्चू कड़ू यांनी सांगितले.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील तसेच महादेव जानकर देखील आमच्यासोबत येतील असा विश्वास तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला.
तस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हणाले की, स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार आम्ही या निवडणुकीत देणार आहे. आमच्याकडे छोट्या मोठ्या ३० ते ४० संघटना आहे. प्रस्थापित लोकांच्या विरोधात लढा देणारे उमेदवार देणार असल्याची माहिती छत्रपती संभाजीराजे यांनी दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. पण त्यांनी अद्याप निर्णय घेतला नाही. त्यांनी आमच्यासोबत यावं अशी आमची भूमिका आहे. राज्यात आचारसंहिता लागू होऊन तीन दिवस झाले आहेत.
Marathi e-Batmya