मागील काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा सातत्याने चर्चेत येत आहे. तसेच औरंगजेबाच्या कबरीवरून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने उपस्थितीत करत कबर उखडून टाकण्याची मागणी केली. त्यावरून नागपूरात हिंसाचारही झाला. तर त्याचे पडसाद विधानसभेतही उमटले. त्यावरून राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सुनिल आंबेकर यांनी हे प्रकरण अनावश्यक असल्याचे सांगत या प्रकऱणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर औरंगजेबाच्या कबरीवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाहक भैय्याजी जोशी यांनीही आता याप्रकरणी भाष्य केले,
नागपूरातील एका कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले भैय्याजी जोशी म्हणाले की, औरंगजेबाचा मृत्यू इथे झाला तर त्याची कबर येथे राहणार ना. ज्यांची त्याच्यावर श्रद्धा असेल ते लोक त्याच्या कबरीवर जातील. पण हा वाद अनावश्यकपणे उकरून काढला जात असल्याचेही यावेळी मत व्यक्त केले.
पुढे बोलताना भैय्याजी जौशी पुढे बोलताना म्हणाले की, शिवाजी महाराजांचा आदर्श आहे. त्यांनी तर अफझलखानाच कबर किल्ल्यावर बनवली आहे. हे भारताच्या उदारतेचं सर्वसमावेशकतेचं प्रतिक असल्याची स्तुती सुमनंही उधळली.
दरम्यान, राज ठाकरे यांनी नुकतेच मनसेच्या गुढी पाढवा मेळाव्यात बोलताना म्हणाले की, औरंगजेबाच्या कबरी वरची सगळी सजावट काढून टाका, फक्त कबर दिसली पाहिजे,आणि तिथे एक बोर्ड लावा आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगबजेब इथे गाडला गेला असं त्यावर लिहा आणि सांगा हा आमचा इतिहास आहे.
राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, औरंगजेब इथे शिवाजी महाराजांचा विचार मारायला आला होता, पण हे जमलं नाही औरंगजेबाला, शेवटी तो इथेच मेला असे सांगितले होते.
Marathi e-Batmya