भास्कर जाधव संतापून म्हणाले, सरकार तुमचं आहे म्हणून मान-सन्मान काय ठेवणार की नाही विधानसभेत अजित पवार यांनी निवेदन केल्यानंतर भास्कर जाधव संतापले

विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास झाल्यानंतर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारचे निवेदन वाचून दाखविले. त्या निवेदनावरून शिवसेना उबाठाचे आमदार भास्कर जाधव यांनी संताप व्यक्त करत केला. भास्कर जाधव यांच्या संतापाला उत्तर देताना अर्थमंत्री अजित पवार यांनी त्यावर उत्तर देत म्हणाले की, १८ जून रोजी यासंदर्भात निर्णय झाला आहे. फक्त दोन्ही सभागृहातील सदस्याच्या माहितीसाठी हे निवेदन वाचून दाखविले असल्याचा खुलासा केला. त्यामुळे काही काळ संतापलेले भास्कर जाधव शांत झाल्याचे चित्र पाह्यला मिळाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवेदन करताना म्हणाले की, २०४७ सालच्या विकसित महाराष्ट्रासाठी नागरी सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. त्या सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक राज्यातील नागरिकांना आपल्या सूचना-विचार राज्य सरकारला करता येणार आहे. तसेच या अभियानात जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा यासाठी प्रत्येक विधानसभा-विधान परिषदेच्या सदस्यांनी आपपाल्या मतदारसंघात मेळावे आणि अभियानाच्या अनुषंगाने छोटे-मोठे कार्यक्रम करावेत असे सांगितले.

त्यानंतर शिवसेना उबाठाचे आमदार भास्कर जाधव म्हणाले की, तसं बघायचं झालं तर सरकारकडून एखाद निवेदन करण्यात आले की, त्यावर प्रश्न विचारले जात नाही. पण आता मला बोलल्याशिवाय रहात नाही. त्यामुळे कारण विधिमंडळाच्या नियमानुसार अधिवेशात जर एखाद्या गोष्टीवर निर्णय घ्यायचा असेल तर सरकारने तो निर्णय घेतल्यानंतर त्याची सर्वात आधी माहिती विधिमंडळाच्या दोन्ही सभागहात माहिती देणे  आवश्यक आहे. पण तुम्ही सरकारने कोणाचा मान-सन्मान ठेवायचेच नाही असे ठरविले आहे. परंतु हे कुठे तरी थांबणार आहे की नाही असा सवाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केला.

तसेच पुढे बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, सरकार तुमचे आहे, बहुमत तुमच्या पाठिशी आहे. त्यामुळे तुम्ही कधीही कसेही निर्णय घ्याल, पण त्याची माहितीही साधी देणार नाही का? आधीच तुम्ही कोणत्याच गोष्टीचा मान-सन्मान ठेवण्याचे मोडीत काढण्याचे ठरविले आहे. त्यामुळे पण हे कुठे तरी थांबणार आहे की असा सवाल करत नागरी सर्व्हेक्षण आणि २०४७ च्या विकसित महाराष्ट्र अभियानाचे पोस्टर बॅनर यापूर्वीच राज्यांच्या रस्तांयवर लागले. त्या संदर्भातील माहिती यापूर्वीच लोकांना कळाली. आता त्यानंतर तुम्ही सभागृहाला माहिती देत आहात, त्यामुळे या सभागृहाचा काही मान-सन्मान ठेवणार आहात की नाही असा सवाल केला.

त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, यासंदर्भात जून महिन्याच्या राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय झाला आहे. तसेच त्याची माहिती यापूर्वीच राज्यातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरु झालेले आहेत. मी शासनाच्या वतीने या संदर्भातील माहिती पुन्हा दोन्ही सभागृहातील सदस्यांना माहित व्हावी त्यासाठी मी हे निवेदन वाचून दाखविले. यावर मुख्यमंत्री आणि इतरांचे काय आहे मला माहिती नाही असे स्पष्ट केले.

अजित पवार यांच्या उत्तरावर संतापलेले भास्कर जाधव शांत झाले. दरम्यान भास्कर जाधव यांनी काही वेळानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सरकारच्या धोरणावरून संताप व्यक्त करताना म्हणाले की, काही महिन्यापूर्वी एका गोष्टीबाबत सभागृहाने महिना भरात निर्णय घेतला. मात्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाबाबतच्या निर्णयाबाबत कोणतीच भूमिका राज्य सरकार आणि विधानसभेकडून जाहिर केली जात नाही. आता तर मला माझ्या तोंडाचा पट्टा सुरु करावाच लागेल, मला आता बोलावचं लागेल असे विधानसभा अध्यक्षांना उद्देशून म्हणाले.

त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, काही काही गोष्टींबाबत महिना दोन महिन्यात निर्णय होतात. तर काही काही गोष्टींना तीन ते चार महिने झाले तरी निर्णय होत नाही. तुमच्या विरोधी पक्षनेते पदाबाबतही अद्याप निर्णय झाला नाही. पण त्यासंदर्भात निर्णय होईल अशी आश्वसक माहितीही यावेळी दिली. त्यानंतर भास्कर जाधव शांत झाले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, नगरपालिका निवडणुकांमध्ये लोकशाहीचे वस्त्रहरण सालेकसामध्ये मतदान संपल्यावर १७ ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा मतदान पण गुन्हा दाखल नाही

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये बोगस मतदान, दडपशाही व सर्व नियम धाब्यावर बसवून मतदान झाले. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *