भाजपाने आमदार चरण वाघमारेसह चारजणांना दाखविला घरचा रस्ता बंडखोर उमेदवारी मागे न घेतल्याने पक्षातून निष्कासित

मुंबईः प्रतिनिधी
विधानसभा निवडणूकीत तिकिट मिळेल, नाही मिळाले तर बंडखोरी करत निवडणूकीच्या रिंगणात उतरणारे तुमसरचे विद्यमान आमदार चरण वाघमारे, नगरसेविका गीता जैन यांच्यासह चार जणांना पक्षातून काढून टाकल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली.
भारतीय जनता पार्टी- शिवसेना महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात बंडखोरी करून निवडणूक लढविणाऱ्या आमदार चरण वाघमारे, मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या नगरसेविका गीता जैन, पिंपरी-चिंचवडचे बाळासाहेब ओव्हाळ, आणि लातूरचे दिलीप देशमुख यांना निष्काषित केले. तर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविणारे भाजपा पालघर जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे यांनी पक्षाचा राजीनामा दिला.

 

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचे मत, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुलेंच्या विचारांची आजच्या काळातही नितांत गरज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त काँग्रेस पक्ष वर्षभर विविध उपक्रम राबविणार; बारामतीतून उमेदवारी अर्ज माघारी घेतला पण पाठिंबा दिलेला नाही;

महात्मा ज्योतीबा फुले यांचे महाराष्ट्रासाठी व देशासाठी मोठे योगदान आहे. सत्यशोधक चळवळ, पुरोगामी चळवळीचा वारसा, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *