भाजपाची पहिली यादी जाहिरः या नव्या आणि विद्यमान आमदारांना संधी देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील यांचा पहिल्या यादीत स्थान

राज्यातील विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर महाविकास आघाडी आणि महायुती, तिसरी आघाडी, मनसे आणि आता मनोज जरांगे पाटील यांच्याकडून विधानसभा निवडणूकीत उभे करण्याचा निर्णय अशी पंचरंगी लढत विधानसभा निवडणूकीत दिसणार आहे. यातील अनेक राजकिय पक्षांच्या उमेदवारी आणि जागा वाटपाच्या संदर्भात अद्याप एकमत झालेले नसताना भाजपाची पहिली यादी आज प्रकाशित दिल्लीहून प्रसिद्ध झाली.

भाजपाच्या पहिल्या यादीत विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. मात्र गतवेळी तिकीट कापण्यात आलेले भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मात्र पाच वर्षाच्या अंतरानंतर पुन्हा एकदा कामठी मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. तर नागपूरातून देवेंद्र फडणवीस यांनाही पहिल्या उमेदवारी यादीत स्थान देण्यात आले आहे. याशिवाय मुंबईतील १४ विधानसभा मतदारसंघातील भाजपाने उमेदवार जाहिर केले आहेत. तसेच यावेळी पहिल्यांदाच भाजपाने विद्यमान आमदार तथा मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्याबरोबर त्यांचे बंधू विनोद शेलार यांनाही उमेदवारी जाहिर केली आहे. तसेच मुंबईतील काही जागांवरील उमेदवार मात्र भाजपाने जाहिर केलेले नाही.

दरम्यान, पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिलेली आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील बहुतांष आमदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे. तसेच नुकतेच भाजपावासी झालेले अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजा चव्हाण यांना उमेदवारी जाहिर करण्यात आलेलीआहे. त्याचबरोबर आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार यांच्यासह अन्य काही नव्या उमेदवारांना संधी दिली आहे.

भाजपाने आज जाहिर केलेल्या पहिल्या यादी ९९ जणांची असून उर्वरीत यादी नंतर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र भाजपा आणि महायुतीच्या निवडणूक फॉर्मयुल्यानुसार १५० ते १७० जागा एकट्या भाजपाकडून राज्यात लढविण्यात येणार आहेत. त्यातील ९९ जागांची उमेदवारांची यादी आज जाहिर करण्यात आली आहे. उर्वरित यादी दोन किंवा तीन टप्प्यात जाहिर करण्यात येणार असल्याचे भाजपाचे प्रदेसाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४०-६० जागा देण्याचा निश्चिय भाजपाचा प्रयत्न आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला भाजपा ७० ते ८० जागा देणार असल्याची चर्चा आहे. तसेच काही जागांबाबत अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाबरोबर भाजपाची बोलणी सुरु आहे. ती अंतिम झाल्यानंतर भाजपाकडून त्यांच्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यावर आज तोडगा निघाल्यास अजित पवार यांच्याकडून त्यांच्या पक्षाची तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहिर करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगितले.

भाजपाची ९९ उमेदवारांची पहिली यादी खालीलप्रमाणेः-

 

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संकल्पनेतील गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजनेची फलश्रुती गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार २.० मुळे राज्यात जलसाठा क्षमता वाढ

राज्यातील जलसुरक्षा बळकट करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *