बुरा ना मानो….म्हणत चित्रातला वाघ मांजरीनीपेक्षा भित्रा, सुषमा अंधारे यांची टीका शिंदे गटातील फुटीर नेत्यांवर टीका करत भाजपा नेत्यांवरही साधला निशाणा

आज होळीनंतरचा धुळवडीचा सण या सणाच्या निमित्ताने सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकांनीही या धुळवडीचा आनंद कुटुंबिय, कार्यकर्त्यांसह साजरा करण्यास सुरुवात केली. तर काही नेत्यांनी प्रतिस्पर्धी नेत्यांवर किंवा पक्षावर राजकिय टीके-आरोपांची राड टाकत राजकीय धुळवड साजरी केली. यात शिवसेना उबाठाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सत्ताधारी भाजपा, शिवसेना शिंदे पक्षाच्या नेत्यांवर राडीचे शाब्दीक फटकारे ओढत राजकिय धुळवडीला पसंती दिल्याचे दिसून येऊ आले. त्यांच्या या राजकिय शब्दांच्या राडीला अद्याप तरी सत्ताधारी वर्गातील कोणत्याही महिला नेत्यांनी उत्तर देत सुषमा अंधारे यांच्याबरोबर शाब्दीक धुळवड मात्र साजरी करण्यासाठी कोणी उतरले असल्याचे दिसून आले नाही.
शिवसेना उबाठाच्या सुषमा अंधारे यांनी एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट करत बुरा ना मारो होली है असे सांगत आपला व्हिडीओ शेअर केला आहे.

त्या व्हिडीओत सुषमा अंधारे म्हणाल्या की, देवाभाऊ तारी त्याला कोण मारी सांगत ज्याने बाळासाहेबांना समृद्धसाठी केली लबाडी, सत्ता स्वातंत्र संपताच त्यांची टोचायला लागली दाडी, फडणवीसांच्या कृपेने, धसांचा गेला जसा उंच उच झोका, फडणवीसांच्या कृपेने धसांचा गेला उंच उंच झोका, अन् बावनकुळेंच्या गौप्यस्फोटाने जमिनीवर आले सुरेश आका, दरवेळी नवा गडी नवं राज्य, दरवेळी नवा गडी नवं राज्य, नवा पक्ष, नवी चुल, तारीख पे तारीख म्हणत महाराष्ट्राच्या जनतेला भूल आणि एका खासदारकीच्या तुकड्यासाठी दिल्ली दरबारी नतमस्तक, नार्वेकरांचा राहुल याच्या तेच्यावर आरोप करत म्हणाला घालीन बेड्या, ह्याच्या त्याच्यावर आरोप करत म्हणाला घालीन बेड्या.स्वकीयांनीच गेम करत त्याच्या बाहेर काढल्या सीड्या अशी कविता सादर करत सत्ताधारी भाजपामधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधला.

सुषमा अंधारे पुढे त्यांच्या कवितेतून म्हणाल्या की, चिरी-मिरी खाऊन आता ज्यांचे पोट, चिरी-मिरी खाऊन आता ज्यांचे भरले पोट, ईडीच्या भीतीने धरले कमळीचे बोट ईडीच्या भीतीने धरले कमळीचे बोट, लाच खाऊ गुंडा-पुंडांची पक्ष प्रवेशासाठी जत्रा आहे, लाच खाऊ गुंडा-पुंडाची पक्ष प्रवेशासाठी जत्रा आहे, चित्रातला वाघ तर मांजरीपेक्षा भित्रा आहे, चित्रातला वाघ तर मांजरी पेक्षा भित्रा आहे, सदा, गुणा, राणा, राणा, रुपा यांचा महायुतीने भरवला बाजार आहे, सदा, गुणा, राणा, रुपा यांचा महायुतीने भरवला बाजार आहे, जिहाद, हलाल, झटका, मटका हा टिल्याचा मानसिक आजार आहे, असे सांगत बुरा ना मानो होली है असे म्हणत आपल्या कवितेची सांगता केली आहे.

सुषमा अंधारे यांच्या या राजकिय धुळवडीच्या कवितेला सत्ताधारी पक्षातील एकाही नेत्याने प्रत्युत्तर देत आपणही राजकिय कवितेच्या धुळवडीत मागे नसल्याचे अद्याप तरी दाखवून दिले नाही.

About Editor

Check Also

नरहरी झिरवाळ यांची माहिती, ‘ब्लिंकइट’द्वारे कालबाह्य अन्न वितरण प्रकरणात कंपनीवर कारवाई विधानसभेत भीमराव तापकीर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना माहिती

पुणे शहरात ब्लिंकइट या ऑनलाईन अन्न वितरण सेवेच्या माध्यमातून कालबाह्य खाद्य पदार्थांचे वितरण होत असल्याबाबत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *