तब्बल दोन वर्षानंतर तुरुंगातील ओबीसी नेता बाहेर छगन भुजबळ यांना मुंबई उच्च न्यायालयाने केला जामीन मंजूर

मुंबई : प्रतिनिधी

विविध आर्थिक घोटाळ्याप्रकरणी मागील दोन वर्षापासून भायखळा येथील आर्थर रोड तुरुंगात असलेले राज्याचे ओबीसी नेते तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.

सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जांमीन फेटाळल्यानंतर भुजबळ पुन्हा मुंबई उच्च मुंबई न्यायालयात धाव घेतली. त्यावर अखेर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा आज अखेर जामीन मंजूर केला.

सर्वोच्च न्यायालयाने पीएमएलए या आर्थिक घोटाळ्याशी संबधित कायद्यातील कलम ४५(१)  हे रद्द केले. त्यामुळे भुजबळ आणि त्याचे पुतणे समीर भुजबळ यांनी सर्वोच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांना मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्यास सांगत जामीन देण्यास नकार दिला. त्यानुसार भुजबळ यांनी उच्च न्यायालयात २ एप्रिल रोजी जामीनसाठी अर्ज दाखल केला. त्यावर अखेर आज ४ मे ला दुपारी त्यांच्या जामीन अर्जावर सुणावनी झाली. यावेळी भुजबळ यांच्या वकीलांनी भुजबळ यांचे वय ७१ असल्याचे सांगत मागील दोन वर्षापासून तुरुंगात असल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. अखेर या कारणांच्या आधारे न्यायालयाने छगन भुजबळ यांचा जामीन मंजूर केला.

छगन भुजबळ यांना जामीन मंजूर झाल्याने ते संध्याकाळ पर्यंत बाहेर येतील अशी शक्यता त्यांच्या वकीलांनी वर्तविली.

About Editor

Check Also

महाराष्ट्रात धार्मिक स्वातंत्र्य विधेयक कायदा विधानसभेत सादर प्रलोभन किंवा फसवणुकीद्वारे धर्मांतर केल्यास शिक्षेची तरतूद ० धार्मिक धर्मांतराच्या ६० दिवस आधी लेखी सूचना आवश्यक

महाराष्ट्रात जबरदस्तीने धर्मांतर आणि तथाकथित “लव्ह जिहाद” रोखण्याच्या उद्देशाने, भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने शुक्रवारी विधानसभेत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *