चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा, भूमी गैरव्यवहार प्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्याचे निलंबन आठ मुद्रांक अधिकाऱ्यांवरही कारवाईचे संकेत

नाशिक जिल्ह्यातील संगमेश्वर येथील भूमाफियांनी केलेल्या सिटी सर्व्हे क्रमांक १४४ भूखंडाच्या फसवणुकीप्रकरणी उपविभागीय अधिकारी उदय किसवे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर येत्या एका महिन्यात विभागीय चौकशी करून कठोर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवार,४ जुलै रोजी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी सभागृहात सांगितले की, संगमेश्वर येथील सिटी सर्व्हे क्रमांक १४४ या भूखंडाची बिनशेती (एनए) परवानगी न घेता, शासकीय मोजणी न करता, नजराणा न भरता आणि तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करत १६ तुकडे करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, हे भूखंड खरेदीखतात ‘बैल गोठ्यांसाठी’ खरेदी केल्याचे निदर्शनास आले आहे.

यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, या प्रकरणात कायद्याचे उल्लंघन झाले आहे, हे खरे आहे. एकूण २५८ दस्तऐवज (डीड) नोंदवण्यात आले आहेत. मुद्रांक अधिकारी घुरके, गावित, गुप्ते, हिरे, कळसकर यांनी अनधिकृत दस्त नोंदणी केल्याने त्यांची विभागीय चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
२०१३ सालापासून आठ मुद्रांक अधिकाऱ्यांनी चुका केल्याचे सांगत कोणते दस्त चुकीचे नोंदवले आहेत, याची येत्या सात दिवसांत प्राथमिक चौकशी करून अधिवेशनाच्या अखेरपर्यंत सभागृहात माहिती दिली जाईल, असे आश्वासनही दिले.

तसेच शेवटी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, तसेच, या प्रकरणात मालेगाव (नाशिक) येथील मुद्रांक अधिकारी (स्टॅम्प व्हेंडर) झाकीर आणि आरीफ अब्दुल लतीफ तसेच त्यांचे साथीदार अपव्यवहारात दोषी आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, एमपीएससीच्या अनागोंदी कारभाराप्रकरणी अध्यक्ष व सचिवांची हकालपट्टी करा एमपीएससीच्या भोंगळ कारभाराला कंटाळून धाराशीव जिल्ह्यातील प्रथमेश देशमुखची आत्महत्या हा सरकारने घेतलेला बळी, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

भाजपा सरकारच्या काळात पेपरफुटीने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा करून ठेवला आहे. पेपरफुटीने त्रस्त विद्यार्थ्यांना MPSC च्या भोंगळ कारभाराचाही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *