Breaking News

चंद्रशेखर बावनकुळे यांचे उद्धव ठाकरे यांना आव्हान, या पाच प्रश्नांची उत्तरं द्यावीत

शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना या वर्तमान पत्राचे संपादक संजय राऊत यांना मुलाखत दिली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. या मुलाखतीतवरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका करत पाच प्रश्न उद्धव ठाकरे यांना देत याची उत्तरे देण्याचे आव्हान दिले.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील अनेक प्रसारमाध्यमांच्या संपादकांना मुलाखती देत असताना

उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आपलेच कर्मचारी असलेल्या संजय राऊत यांना मॅनेज मुलाखत दिली अशी खोचक टीका केली.

पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ही मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच असल्याची उपरोधिक टीकाही केली.

यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी या प्रश्नांची उत्तरं द्यावीत असे आव्हानही दिले.

१. दहशतवादी कसाबचं समर्थन करणाऱ्या काँग्रेस आणि विजय वडेट्टीवार यांच्याबद्दल तुमची भूमिका काय?

२. १९९३ च्या मुंबई बाँबस्फोटातील गुन्हेगार तुमच्या उमेदवाराच्या प्रचारात का होता?, हा देशद्रोही प्रचारात बघून तुम्हाला लाज वाटली नाही का?

३. सत्तेवर आल्यास हिंदुची संपत्ती मुस्लिमांना वाटण्याचा काँग्रेसचा मनसुबा आहे त्यावर तुम्ही मूग गिळून गप्प का बसलात?

४. ⁠ राहुल गांधी आणि काँग्रेसचे चेलेचपाटे सातत्यानं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात त्याबद्दल तुम्ही गप्प का आहात?

५. उदयनिधी स्टॅलिन हा हिंदू धर्म संपवण्याची धमकी देतो आणि तुम्ही त्याच्या मांडीला मांडी लावून का बसला होता?

उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान आहे की, हिंमत असेल तर एक मुलाखत देऊन त्यांनी या प्रश्नांचीही उत्तरं द्यावीत, महाराष्ट्रातील जनता या उत्तरांची वाट पाहत आहे.

Check Also

पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचे न्यायिक काम परभणीतून

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण व गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच हिंगोली स्वतंत्र न्यायिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *