चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका, नाना, मतं मिळविण्यासाठी गिधाडवृतीने…

अकोल्याचे खासदार संजय धोत्रे प्रकृतीच्या कारणास्तव व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांच्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेले वक्तव्य निंदनीय आहे, घाणेरड्या राजकारणासाठी कुणाचे मरण चिंतू नये आणि मते मिळविण्यासाठी गिधाडांच्या वृत्तीने वागू नका, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्स समाज माध्यमावर नाना पटोले यांना प्रत्युत्तर देताना म्हणाले की, अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांना दीर्घायुष्य लाभो. त्यासाठी आम्ही सर्वजण रोज प्रार्थना करीत असतो. पण त्यांच्याबद्दल अभद्र बोलून त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य नागरिकांच्या, अकोला मतरसंघातील मतदारांच्या मनाला वेदना पोहोचविल्या आहेत. तुम्हाला ही जनता माफ करणार नाही.

चंद्रशेखर बावनकुळे पुढे बोलताना म्हणाले, कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. तुम्ही भाजपाविरोधात हवा तेवढा खोटा प्रचार करा, लोकांची मते मिळविण्यासाठी कुणासमोरही पायघड्या घाला. पण तुमच्या घाणेरड्या राजकारणासाठी कुणाचे मरण चिंतू नका. कुणाच्या मरणाची वाट बघत त्यावर पोट भरणं ही गिधाडांची वृत्ती असते. आणि केवळ मते मिळविण्यासाठी तुम्ही गिधाडांच्या वृत्तीने वागू नका असा टोसाही यावेळी लगावला.

About Editor

Check Also

प्रताप सरनाईक यांची माहिती, एसटीची आर्थिक घडी मजबूत करण्यासाठी बहुआयामी उपाययोजना केवळ डिझेल खरेदीतून वर्षाला २४१ कोटी रुपयांची बचत

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) आर्थिक स्थिती सक्षम करण्यासाठी पर्यायी उत्पन्न स्रोत निर्माण करण्याबरोबरच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *