Breaking News

चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार, उद्धव ठाकरेंना चिथावणीखोर भाषा शोभत नाही धर्माच्या आधारावर मते घेण्याची भाषा

उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी ज्या भाषेचा वापर केला आहे, त्यातून त्यांनी मानसिक दिवाळखोरी दाखवून दिली आहे, असा हल्लाबोल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. देवेंद्र फडणवीस आणि तुमची काय क्षमता आहे, असाही सवालही केला.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरेंना चिथावणी देणारी भाषा शोभत नाही, त्यांनी ज्याप्रकारच्या शब्दांचा वापर केला, ते जर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ऐकले असते तर त्यांना काय वाटले असते. उद्धव ठाकरे अशा भाषेचा वापर हिंदुत्व सोडून ख्रिश्चन आणि मुस्लिम मतांच्या भरवशावर करीत आहेत. देवेंद्र फडणवीस राज्याला विकासाकडे नेणारे आणि नवे व्हिजन देणारे नेतृत्त्व आहे. उद्धव ठाकरे हे आता जाती-पातीच्या राजकारणावर उतरले असून धर्माच्या आधारावर मते घेण्याची भाषा करीत आहे. महाराष्ट्रातील जनता त्यांना मतांनी झोडपल्याशिवाय राहणार नाही अशी टीकाही यावेळी केली.

पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, हे राज्य संस्कारमय राज्य आहे. सर्व धर्म, सर्व समाज येथे एकत्र राहतो. जातीपातीचे राजकारण करून समाजा-समाजात तेढ निर्माण करण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले आहे, त्यांच्या विभाजनकारी भाषेवर आमचा आक्षेप आहेच. भाजपा त्याच्या ‘आरे च्या भाषेला कारे’ अशा शब्दात उत्तर देईल असा इशाराही यावेळी दिला.

चंद्रशेखर बावनकुळे बोलताना म्हणाले की, १० वर्षे मोदींच्या सभामुळे उद्धव ठाकरे यांचे खासदार निवडून आले, पण आता ते उपकार विसरले आहेत. एकीकडे भगवान शंकराचे नाव घ्यायचे आणि अशी भाषा वापरायची ही संस्कृती आणि संस्कार आहेत का? असा सवाल करत नाशिक, परभणीच्या व मुंबई येथे उबाठा गटाच्या विजयी मिरवणूकीत पाकिस्तानचे झेंडे झळकले. जातीपातीचे राजकारण करून समाजा-समाजात तेढ निर्माण करण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले असा आरोपही यावेळी केला.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *