चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, चुकीच्या बातम्या देऊ नका, अधिवेशन होणार विधानसभेसाठी भाजपा बूथ स्तरापर्यंतची संघटना सक्षम करणार

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी जवळपास ९७ हजार बूथ, शक्तीकेंद्र तसेच मंडल स्तरावर संघटना सक्षमीकरणाला प्राधान्य देणार आहे अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी दिली.

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश सहमुख्य प्रवक्ते आशीष देशमुख आदी उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व शक्तिनिशी महायुती एकत्रितरित्या उतरणार असून महायुतीला मोठा विजय मिळेल असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला

भाजपा प्रदेश कार्यालयात दोन दिवस झालेल्या ३० पदाधिका-यांच्या बैठकी बाबतची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी देत म्हणाले की, विधानसभा निवडणुकीसोबतच भाजपा, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्राम पंचायत आणि महापालिका निवडणुकांच्या तयारीला लागणार आहे. या बाबतची विस्तृत योजना गुरुवारी झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत आखली गेली. विधानसभा निवडणुकीबरोबरच पंचायत समिती, नगर पालिका आणि महापालिका स्तरावरील नेत्यांना यथायोग्य जबाबदारी दिली जाणार आहे. महायुतीच्या सर्वसमावेशक अर्थसंकल्पातील विशेष तरतुदी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची योजना कोअर कमिटीच्या बैठकीत ठरवण्यात आली तसेच डबल इंजिन सरकारचा अधिकाधिक लाभ राज्यातील जनतेला कसा करून देता येईल याचीही चर्चा करण्यात आल्याचे सांगितले.

तसेच पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, २१ जुलै रोजी पुणे येथे पक्षाचे अधिवेशन होणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मार्गदर्शन होणार आहे. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह हे या अधिवेशनाचा समारोप करणार असल्याची माहितीही दिली.

बैठकीबाबत कल्पित बातम्या देऊ नका

गुरुवारी झालेल्या बैठकीत मित्रपक्षांबाबत कुठल्याही प्रकारची चर्चा, टिप्पणी भाजपाच्या नेत्यांनी केली नसताना माध्यमांमधून चुकीच्या बातम्या देत महायुतीमध्ये जाणीवपूर्वक ठिणगी पाडण्याचे काम करण्यात आल्याचा आरोपही चंद्रशेखर बावनकुळे यांनी करत बैठकीत झालेल्या चर्चेबाबत पक्षाकडून माहिती दिली जाते. जे घडलेच नाही ते घडल्याची बातमी देणे माध्यमांनी थांबवावे असे आवाहनही यावेळी केली.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, नगरपालिका निवडणुकांमध्ये लोकशाहीचे वस्त्रहरण सालेकसामध्ये मतदान संपल्यावर १७ ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा मतदान पण गुन्हा दाखल नाही

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये बोगस मतदान, दडपशाही व सर्व नियम धाब्यावर बसवून मतदान झाले. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *