छगन भुजबळ यांची स्पष्टोक्ती, निर्णय घेण्यासाठी चर्चा करतोय…पण अजित पवार यांचा पक्ष सोडणार- ओबीसी कार्यकर्त्यांसोबत बैठकांच सत्र सुरु

राज्यातील महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना स्थान देण्यात आलं नाही. त्यामुळे ओबीसी कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचे नेते प्रफुल पटेल यांच्यावर टीका करत मी काही तुमच्या हातातील खेळणे आहे का असा सवाल कर अजित दादा यांच्याबद्दल बोलताना मी कोणत्या दादा फिदाला ओळखत नसल्याचे सांगत अजित पवार यांच्याबद्दलही नाराजी व्यक्त केली. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ अजित पवार यांच्या पक्षातून बाहेर पडणार असल्याचे बोलले जात आहे.

त्यातच शिवसेना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांनी छगन भुजबळ नेहमीच संपर्कात असतात असे सांगत एकच खळबळ राज्याच्या राजकारणात उडवून दिली होती. दुसऱ्याबाजूला छगन भुजबळ यांच्या नाशिकमधील त्यांच्या घरी सातत्याने ओबीसी नेते आणि कार्यकर्त्यांच्या सातत्याने बैठका सुरु आहेत. या संदर्भात छगन भुजबळ यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले असता ते म्हणाले की, निर्णय घेण्यासाठी वेळ लागतोय, आपण सर्वांशी चर्चा करत असल्याचेही यावेळी सांगितले.

छगन भुजबळ पुढे बोलताना म्हणाले की, आज ओबीसी नेत्यांची बैठक झाली. त्यांनी या बैठकीनंतर विचारणा केली की असं कसं होऊ शकतं, तुम्ही ओबीसींच्या प्रश्नी सातत्याने भूमिका घेतली आहे. तसेच ओबीसींच नेतृत्व करता. तसेच ओबीसींचे प्रश्न विधानसभेत मांडले, आता तुम्हाला मंत्रिमंडळातून बाहेर ठेवलं याच्या मागे काही तरी गौडबंगाल आहे. तुम्ही नेहमीच ओबीसींच्या मुद्यांची पाठराखण केली आहे. त्यामुळे आम्हाला वाटतं की हे काही तरी वेगळं आहे. त्यामुळे आम्ही तुमच्यासोबत आहोत. आता पुढे काय करायचं ते आपण बसून ठरवू असे ओबीसींच्या नेत्यांनी सांगितल्याची माहितीही यावेळी सांगितले.

पुढील भूमिका काय असा सवाल केला असता छगन भुजबळ म्हणाले की, माझ्या पुढच्या भूमिकेबाबत तुम्हाला घाई झालेली दिसते. मात्र मला भूमिका घ्यायला वेळ लागणार त्यासाठी सर्वांशी चर्चा करत असल्याचेही यावेळी स्पष्ट केले.

अजित पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, काही जेष्ठांना मंत्रिपदं दिली नाहीत याचा अर्थ तरूणांना मंत्री पदाची संधी द्यायची असते असे सांगितले. त्यावर छगन भुजबळ म्हणाले की, तरूणांना मंत्रिमंडळात संधी द्यायची ही गोष्ट चांगली आहे. पण त्यासाठी तरूणांना संधी देण्याची व्याख्या ठरविली पाहिजे असे सांगत किती वर्षापर्यंत तरूण म्हणायचं, मग ६७-६८ वर्षापर्यंत तरूण म्हणायचं का हे ठरवलं पाहिजे असा सवालही यावेळी केला.

शेवटी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, मला सांगितलं असतं की तुम्ही निवडणूकीला उभं राहु नका तर मी राहिलो नसतो, पाच महिन्यापूर्वी मला लोकसभेत पाठवत होते. तेव्हा माझी तयारी झाली. मात्र तेव्हाही मला थांबाव लागलं. त्यानंतर राज्यसभेची निवडणूक आली. तेव्हा म्हटलं राज्यसभेवर पाठवा. त्यावेळी मला म्हणाले राज्यात तुमची गरज जास्त आहे. मग आता गरज कमी झाली का असा सवाल करत असं होतं तर मला निवडणूक लढवायला सांगायचं नव्हतं. आज माझ्या मतदारसंघात एक वेगळं वातावरण निर्माण झालं नसतं. आता सर्व झाल्यावर मला सांगतात राज्यसभेत जा म्हणून, राज्यसभेत जायचं म्हटलं तर मला विधानसभेचा राजीनामा द्यावा लागेल. मी राजीनामा कसा देऊ असा सवालही यावेळी केला.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, काँग्रेसच्या नगरपालिका, नगरपंचायत उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण शिबिर पहिल्या टप्प्यात कोकण विभागातील तीन दिवसीय निवासी शिबिर २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी चिपळूणमध्ये

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकांमधील काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *