छगन भुजबळ यांचा येवल्यातून उमेदवारी अर्ज, शरद पवार यांच्या चुकीची दुरूस्ती होणार की… मंत्री छगन भुजबळ यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

येत्या गुरूवारी गुरूपुष्यामृत या हिंदू धर्मातील चांगल्या दिवसाच्या पार्श्वभूमीवर भाजपा-शिवसेना- राष्ट्रवादी-आरपीआय महायुती घटक पक्षाचे अधिकृत उमेदवार मंत्री छगन भुजबळ हे गुरुवारी २४ ऑक्टोबर २०२४ रोजी आपला उमेदवारी अर्ज येवला येथे दाखल करणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महायुती घटक पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदारसंघातील नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा येवला लासलगांव विधानसभा मतदारसंघाचे प्रचार प्रमुख अंबादास बनकर यांनी केले.

याबाबत प्रचार प्रमुख अंबादास बनकर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, गेल्या २० वर्षांपासून मंत्री छगन भुजबळ हे येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहे. गेल्या वीस वर्षांच्या काळात त्यांनी हजारो कोटी रुपयांची विकास कामे करून येवला मतदारसंघाचा कायापायलट केला आहे. येवल्याला जलसंजीवनी देणारा मांजरपाडा-पुणेगाव दरसवाडी- डोंगरगांव कालवा, छत्रपती शिवरायांचा पराक्रमाचा इतिहास सांगणारी शिवसृष्टी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणस्पर्शाने पावन झालेली मुक्तीभूमी यासह येवला मतदारसंघात अनेक महत्वपूर्ण प्रकल्प त्यांनी पूर्ण केले असून आज राज्यभरात त्यांनी केलेल्या विकासकामांची चर्चा आहे. येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी संपूर्ण मतदारसंघातील जनता त्यांच्या पूर्ण पाठीशी आहे. त्यामुळे पाचव्यांचा ते येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे विभाजन झाल्यानंतर येवल्याचे आमदार छगन भुजबळ हे शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी खास नाशिक-येवला येथे खास जाहिर सभा घेत येवला येथील विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवार निवडीबाबत चूक झाल्याची जाहिर कबूली देत त्या चुकीची माफी मागण्यासाठी आलो असल्याचे सांगत नाशिक-येवला वासियांना भावनिक साद घातली. त्यास जवळपास दोन वर्षे जवळपास पूर्ण झाली.

सध्या सर्वच राजकिय पक्षांकडून विधानसभा निवडणूकीची लगबग सध्या सुरु आहे. त्यामुळे सर्वच राजकिय पक्षांकडून उमेदवार निवडीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घाई आहे. यापार्श्वभूमीवर दोन वर्षापूर्वी शरद पवार यांनी केलेले आवाहन नाशिक-येवलावासिय लक्षात ठेवणार की, पुन्हा छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या आवाहनापेक्षा केलेल्या विकास कामांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा विधानसभेची निवडणूक जिंकणार हे पाहणे उत्साहवर्धक ठरणार आहे.

त्यातच राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वादाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील मराठा समाज छगन भुजबळ यांना मतदान करणार की मनोज जरांगे पाटील यांच्या घोषणेप्रमाणे मराठा समाजाच्या उमेदवाराला मतदान करणार हे पाहणेही यावेळी अगत्याचे ठरणार आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या चुक दुरूस्तीच्या आवाहनानंतर राज्यातील नाशिकमधील अनेक छगन भुजबळ विरोधी स्थानिकांना शरद पवार यांच्या नेतृत्व आणि पक्षाकडे आकर्षित झाले होते.

त्यामुळे छगन भुजबळ येवल्याची जागा राखण्यात यशस्वी ठरणार की शरद पवार यांच्या आवाहनानुसार चुकीची दुरूस्ती होणार पाहणे उत्सुकतेचा विषय ठरणार आहे.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, काँग्रेसच्या नगरपालिका, नगरपंचायत उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण शिबिर पहिल्या टप्प्यात कोकण विभागातील तीन दिवसीय निवासी शिबिर २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी चिपळूणमध्ये

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकांमधील काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *