मुख्यमंत्री शिंदे यांचा हल्लाबोल, लोकसभेला लोकांनीच ठासून सांगितलंय की शिवसेना… असली नकलीच्या वादावर लोकांनीच निर्णय दिलाय

दसरा सणानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा सीसीएमटी समोरील आझाद मैदानावर पार पडला. या दसरा मेळाव्यात राज ठाकरे आणि सांगितल्या प्रमाणे एकमेकांची उणी दुणी काढली जातील असे भाकित केले होते. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडत म्हणाले जर आम्ही उठाव केला नसता तर शिवसेना आणि हिंदूत्व हे काँग्रेसच्या धावणीला बांधणीला गेली असती, असे सांगत आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही वाटचाल करत आहोत. हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आणि आनंद दिघेंचा शिष्य घासून नव्हे तर ठासून आला असून शिवसेना खरी की नकली याचा निर्णय लोकांनीच लोकसभेला ठासून सांगितल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टीका केली.

पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, गर्व से कहो हम हिंदू है, माझ्या तमाम जमलेल्या माता भगिनीनो असे शब्द म्हणायलाही त्यांच्या सहकारी मित्र पक्षांमुळे आता काही जणांना अॅलर्जी निर्माण झाली असल्याची टीकाही यावेळी केली.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, या आधीच्या मुख्यमंत्र्यांनी सतत कोणत्या ना कोणत्या प्रकल्पाला स्थगिती दिली. एमटीएचएल प्रकल्पालाही त्यांनी अशीच स्थगिती दिली. त्यामुळे या प्रकल्पाची किंमत १७ हजार कोटी रूपयांनी वाढली. इतकेच नव्हे तर धारावीतील फक्त पात्र लोकांनाच घरे देण्याची अटही यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी घातली होती. त्यामुले धारावीचा पुर्नविकास थांबला होता. मात्र आपले सरकार येताच धारावीतील दोन लाख लोकांना अर्थात सर्वांना घरे द्या म्हणून सांगितले, त्यामुळे धारावीचा प्रकल्प मार्गी लागल्याचे सांगत धारावीचा प्रकल्प खर्च वाढल्याचे सांगत धारावीवरून उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात येत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

मुख्यमंत्री शिदे पुढे टीका करताना म्हणाले की, कोविड काळात हे आधीचे मुख्यमंत्री कोणती तरी चाचणी काढून घरात बसायचे आणि मंत्रिमंडळातील मंत्री घराच्या बाहेर आणि हे आत अशी परिस्थिती त्यावेळी यांनी करून ठेवली होती. मात्र दुसऱ्याबाजूला आम्ही रस्त्यावर उतरून लोकांना लागणारी मदत पुरवित होता. कशाचीही पर्वा केली नाही. आधीच्या मुख्यमंत्र्यांच्या काळात महाराष्ट्र तिसऱ्या नंबरवर होता. मात्र आज तो पहिल्या नंबरवर आहे. पायाभूत विकासावर खर्च वाढविला असून आपल्या सरकारमुळे मेट्रो-३ चे उद्घाटन होऊन ती धावायला लागली आहे. जर पूर्वीचे मुख्यमंत्री असते तर मेट्रो-३ कधी धावली नसती अशी खोचक टीकाही यावेळी केली.

पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, त्यांना माझी दाढी फार ढाचतेय, पण हा एकनाथ शिंदे हा मैदान सोडून पळणाऱ्यातील नाही तर मैदानातून पळवून लावणारा आहे. त्यामुळे आधीच सरकारला पळवून लावलं असा टोला लगावत शिंदे पुढे म्हणाले की, मुंबईचा विकास करायचा म्हणून या लोकांनी पैसे खाल्ले पण मुंबईचा विकास केला नाही. त्यामुळेच हे मुंबईच्या पालिकेत अनेक वर्षे सत्तेवर राहिल्याचा आरोपही केला. पण आपल्या सरकारने भविष्यातही यांना पैसे खाता येवू नये सगळे रस्ते सिमेंटचे करण्याचा निर्णय घेत खड्डेमुक्त मुंबई करणार असल्याचंही यावेळी सांगितला.

About Editor

Check Also

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, परिवहन विभागात बदली आणि वसुलीचे मोठे रॅकेट मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांनी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी

परिवहन विभागात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या आणि छळवणुकीच्या गंभीर प्रकरणाचा पर्दाफाश करत आरटीओ विभागातील बदल्या आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *