मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मारकडवाडी, ईव्हीएम मशिबाबत काय दिले उत्तर अधिवेशनानंतर पहिला हप्ता देणार मात्र त्यात कोणताही बदल नाही

विधानसभा निव़डणूकीनंतर राज्यात नव्याने स्थापना झालेल्या महायुती सरकारकडून मुंबईत विशेष घेतल्यानंतर पहिल्यांदाच नागपूरात हिवाळी अधिवेशन घेण्यात आलं. या अधिवेशनात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलेल्या अभिभाषणावर सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील सदस्यांनी आपापली भूमिका मांडली. त्यानंतर यावेळी बोलताना विरोधकांनी बहुचर्चित लाडकी बहिण योजना, बीड आणि परभणी येथील घटनांचा उल्लेख करत राज्य सरकारला जाब विचारला. या सर्वांवर चर्चेनंतर या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणीसंदर्भात सध्या विविध स्तरात तर्क वितर्क लढविण्यात येत असलेल्या पार्श्वभूमीवर लाडकी बहिण योजना अशीच पुढे राहणार असून निवडणूकीत आणि पूर्वी ज्या घोषणा आश्वासने आणि योजना जाहिर करण्यात आल्या त्या तशाच पुढे राहणार असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी आज सभागृहाला आश्वासस्त करू इच्छितो की कोणतीही शंका मनात ठेवू नका, जी आश्वासन दिली आहेत. ज्या योजना आम्ही सुरु केल्या आहेत. त्यातली एकही योजना आम्ही बंद करणार नाही. ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं हे अधिवेशन संपल्यानंतर डिसेंबरचा हप्ता लगेच त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असून त्यात काहीच बदल नसल्याचेही यावेळी सांगितले.

देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, मी स्पष्ट करू इच्छितो की, लाडकी बहिण योजनेसाठी कोणतेही नवे निकष लावले नसून आता आम्ही सर्वांच्या खात्यात पैसे टाकत आहोत. पण प्रथमदर्शनी लक्षात घेत ज्यांनी एकाच बॅकेत चार चार खाती उघडली आहेत. जसं समाजात काही चांगल्या प्रवृत्ती असतात तशा वाईट प्रवृत्तीही असतात, जर कोणी एखादी योजना चुकीच्या पद्धतीने वापरत असेल तर तो जनतेचा पैसा योग्य प्रकारे वापरला गेला पाहिजे ही तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी असल्याचे सांगत आम्हाला कळलं की माणसानंच नऊ खाती उघडली. त्यामुळे त्याला लाडकी बहिम म्हणायचं का बरं लाडका भाऊही म्हणू शकत नाही. बहिणींच्या नावावर डल्ला मारतो तो भाऊ कसला असा इशाराही यावेळी दिला.

त्याचबरोबर शेतकरी, तरूण जेष्ठांबाबत जी काही आश्वासनं दिली आहेत, ती पूर्ण करणार असल्याचेही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
ईव्हीएम संदर्भात विरोधकांनी केलेल्या आरोपांवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विधानसभा निवडणूकीत ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार आहेत. यापैकी ६ कोटी ४० लाख ८८ हजार १९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. म्हणजे ६६.५ टक्के मतदारांनी मतदान केले. सकाळी ७ ते ९ दरम्यान, ६.६१ म्हणजे ६४ लाख १३ हजार ३६० मतदारांनी मतदान केलं. सकाळी ९ ते ११ या कालावधीत ११.५३ टक्के म्हणजे १ कोटी ११ लाख ८६ हजार ९९६ मतदान, सकाळी ११ ते १ या दरम्यान १४ टक्के मतदान झालं म्हणजे,१ कोटी ३६ लाख २२ हजार ३२७ मतदान, दुपारी १ ते ३ मध्ये ३ मध्ये १३.३५ टक्के मतदान म्हणजे, १ कोटी २९ लाख ५२ हजार ८५३ मतदान झालं, दुपारी ३ ते ५ या कालवधीत १२.६९ टक्के मतदान म्हणजे, १ कोटी २३ लाख१२ हजार ४८८ आणि संध्याकीळ ५ ते ६ या कालावधीत जेवढे लोक मतदानासाठी उभे होते त्या सर्वांना मतदान करू देतो, रात्री ८ वाजेपर्यंत मतदान चालतं या वेळेत ७५ लाख ९७ हजार ०६७ मतदारांनी मतदान केल्याचे सांगत महाराष्ट्रात एक लाख मतदान केंद्र होती. त्यामुळे सरासरी मतदान केंद्रार ७५ लोकांनी मतदान केलं ५ वाजेपर्यंत ५८.२२ टक्के मतदान झालं. अंतिम आकडेवारी ६६ टक्के म्हणजे ७.८३ टक्क्यांनी मतदान वाढलं असे सांगत ७५ लाख मतदान वाढल्याचेही यावेळी सांगितले.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांनी मारकडवाडी प्रकरणी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलताना म्हणाले की, मला बाकी कोणाचं आर्श्चय वाटल नाही. मला फक्त शरद पवार याचं आर्श्चय वाटल. शरद पवार हे देशातील तटस्थ नेते आहेत. या आधी काँग्रेसने अनेकदा ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला. पण शरद पवार यांनी तो कधीच मांडला नाही. यावेळी मात्र शरद पवार यांनी पहिल्यांच लॉजिक मांडत ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला. ईव्हीएमच सेटींग असं झालंय की, छोटी राज्य विडरोधक जिंकतात आणि मोठी राज्य आम्ही जिंकतो, कर्नाटक, पश्चिम बंगाल ही राज्ये छोटी आहेत का, असा सवाल करत आता काँग्रेसवालेही एकटे पडले असून जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुला म्हणाले की, ईव्हीएमवर बोलणं सोडून द्या, ममता दिदीनींही हाच सल्ला दिला असा उपरोधिक टोलाही यावेळी काँग्रेसला लगावला.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सर्वसामान्य कार्यकर्ता राम सातपुते पाच वर्षे राबतो आणि २२ कोटींची काम एकट्या मारकडवाडीत करतो. पण त्याला जास्त मिळल्यावर तुम्ही तेथे जाता आणि लोकांना धमवता असा सवाल उपस्थित करत लोकांना धमकाविण्यात आलं की आता बॅलेट पेपरवर मतदान घ्यायचंय आणि मत मिळालं पाहिजे शरद पवार यांच्या काँग्रेसला ही कोणती लोकशाही जिथे मतं मिळत नाहीत म्हणून तिथे दादागिरी करायची लोकशाहीत दादागिरी खपवून घेणार नाही असा इशाराही यावेळी दिला.

यावेळी काँग्रेस आणि विरोधकांना इशारा देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राजद्रोह म्हणजे काय असा सवाल करत सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात व्याख्या केली आहे. ती व्याख्या अशी आहे. जितक्या काही घटनात्मक संस्था आहेत, त्यांच्या विरोधात जनमत तयार करणं, त्या संस्था कशा चुकीच्या आहेत असं सांगण म्हणजे राजद्रोह असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने हे सांगितले आहे. आज आपण हे काम दररोज करत आहोत. हे अयोग्य असल्याचे सांगत एकप्रकारे विरोधकांना इशारा दिला.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, काँग्रेसच्या नगरपालिका, नगरपंचायत उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण शिबिर पहिल्या टप्प्यात कोकण विभागातील तीन दिवसीय निवासी शिबिर २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी चिपळूणमध्ये

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकांमधील काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *