मुख्यमंत्री फडणवीस यांचे मत, जर खरा इतिहास शिकवला असता तर ही वेळच आली नसती… हर्षवर्धन सपकाळ यांच्या टीपू सुलतान बाबतच्या वक्तव्यावरून केली टीका

काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मालेगाव येथील उपमहापौरांच्या दालनात टीपू सुलतान यांचा लावण्यात आलेला फोटो काढल्यावरून म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामापासून प्रेरणा घेत टीपू सुलतान यांनीही इंग्रजाच्या विरोधात काम केले असल्याचे वक्तव्य केले. त्यावरून भाजपा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावरून टीपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजासोबत केली असल्याचे आरोप करत अशी तुलना आम्ही सहन करू शकत नाही असा इशारा दिला. यानंतर बरेच टीका टीपण्णी झाल्यानंतर अखेर हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलगीरी व्यक्त केली.

दरम्यान याच मुद्यावरून या वक्तव्याचे पडसाद अर्थसंकल्पिय अधिवेशात उमटले. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि शिवसेना उबाठाचे भास्कर जाधव यांनी यासंदर्भातील मुद्दा उपस्थित केला. असता त्यास उत्तर देताना मुख्यमंत्री देताना म्हणाले की, आपल्या देशात राष्ट्रभक्त मुसलमान आहेत. परंतु आपल्या देशात खरा इतिहास शिकवला गेला नसल्याचे दावा केला.

विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला मुख्यमंत्री फडणवीस हे उत्तर देत होते. यावेळी शिवसेना उबाठाचे भास्कर जाधव यांनी टीपू सुलतान यांचा विषय उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, टीपू सुलतान चांगले होते की वाईट होते यावर काहीच आक्षेपच नाही. आक्षेप यावर आहे की टीपू सुलतान छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतके मोठे राजे होते असे म्हणणाऱ्याला. शिवाजी महाराजांच्या इतकंच गुणगाण करणं याला आमचा आक्षेप आहे. देशाच्या इतिहासाशी छेडछाड करण्यात आली. त्यामध्ये वर्षानुवर्षे आम्हाला हेच शिकवलं की, टीपू सुलतान महान राजे होते, पण हे कधीही सांगितले नाही की ७५ हजार हिंदू, ३३ हजार नायरांची करणारे तेच टीपू सुलतान होते. हे नाही शिकवलं नाही. ते इंग्रजांशी लढले ते स्वतःच राज्य वाचविण्यासाठी, आता खरा इतिहास सापडतो आहे असेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, वर्षानुवर्षे या देशात सरकारने एनसीआरटी च्या पुस्तकात ७० वर्षे मोगल साम्राज्याच्या इतिहासाला १७ पानं दिली होती. आणि शिवाजी महाराजांच्या इतिहासाला एक परिच्छेद दिला होता. आता मोदी सरकारने छत्रपती शिवरायांच्या , मराठ्यांच्या इतिहासाला एनसीआरटी मध्ये २० पानं दिली आहेत. योग्य वेळी जर नीट इतिहास शिकवला असता तर एकाही मुसलमानाने औरंगजेबाला आपला हिरो म्हटलं नसतं. पण आपल्याला खरा इतिहास शिकवला गेलाच ही असेही सांगितले.

शेवटी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपल्या देशात राष्ट्रभक्त मुसलमान आहेत. त्यांच्याबाबत आमचा कुठलाच आक्षेपच नाही. मात्र जे लोक देशाच्या विरोधातल्या लोकांना, या देशाच्या आक्रमणकऱ्यांना आपला हिरो मानतील त्यांच्या विरोधात आम्ही लढाई करूच असेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

आशिष शेलार यांची माहिती, मुंबईत मराठीसाठी लवकरच स्वतंत्र चित्रनाट्यगृह उभारणार १६४ मराठी चित्रपटांना २४ कोटी १० लाख रुपयांचे अर्थसहाय्य

दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजनेच्या अंतर्गत ऑक्टोबर २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत परीक्षण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *