Breaking News

देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर, मुख्यमंत्री शिंदे खरं आहे म्हणाले तर मी राजकीय संन्याय घेईन मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपावर उपमुख्यमंत्री फडणवीसांचे प्रत्युत्तर

केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणूकीची तारीख अद्याप जाहिर केलेली नसली तरी निवडणूकांचा कालावधी जसजसा जवळ येत चालला आहे, तसतसा राज्यातील राजकिय वातावरण तापू लागले आहे. त्यातच मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर दररोज आरक्षणाचे आंदोलनकर्त्ये मनोज जरांगे पाटील यांच्याकडूनही दररोज मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर दररोज आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर आज मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर नव्याने आरोप केला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्री शिंदे यांनी ते खरं आहे म्हणाले तर मी पदाचा राजीनामा देईन आणि राजकिय संन्यास घेईन अशी घोषणा केली.

मराठा आरक्षण प्रश्नी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तयार आहेत. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आरक्षण देण्यापासून मुख्यमंत्री शिंदे यांना रोखत असल्याचा जाहिर आरोप केला. मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनीही राजकिय संन्यास घेण्याची घोषणा केली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री शिंदे यांनी जर सांगितलं की मराठा समाजाबाबत आरक्षण देण्याचा निर्णय़ घेत आहेत. आणि मी त्यांना आरक्षण देण्यापासून रोखतोय, तर त्या क्षणी मी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन राजकिय संन्यास घेईन अशी घोषणा केली.

तसेच पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांना कदाचित माहित नसावे की, राज्याचे सर्व अधिकार मुख्यमंत्री यांना असतात, तसेच मुख्यमंत्र्यांच्या अधिकारानुसार इतर मंत्री काम करत असतात. मुख्यमंत्री शिंदे आणि मी असे आम्ही एकत्रित काम करत आहोत. त्यांना दिलेले पाठबळ आणि पाठींबा माझं आहे. त्यामुळे त्यांच्याया प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्री शिंदे यांना विचारावं, असा उपरोधिक टोलाही यावेळी लगावला.

देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत एक तर मी निर्णय घेतले नाही तर मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या मागे मी भक्कमपणे उभा आहे. यामुळे जाणीवपूर्वक अशा नॅरेटीव्ह तयार करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आरक्षणाबाबत निर्णय घेताना जर मुख्यमंत्री शिंदे यांना मी रोखलं-अडथळा आणला, निर्णय घेण्यापासून रोखल असेल तर त्यांनी सांगांव, मी तात्काळ पदाचा राजीनामा देईन आणि राजकिय संन्यास घेईन असेही यावेळी सांगितलं.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *