ED चे आदेश प्रताप सरनाईक हाजीर हो.. क्वारंटाईन कालावधी संपल्यावर हजर राहा

मुंबईः प्रतिनिधी
एमएमआरडीतील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर मंगळवारी कारवाई करत त्यांच्या मुलाला ताब्यात घेतले. त्यानंतर आता प्रताप सरनाईक यांनाही ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून क्वारंटाईन कालावधी संपल्यावर हजर राहण्याचे आदेश बजाविण्यात आले.
मुंबई बाहेरुन आल्यामुळे सरनाईक यांनी स्वःताला क्वारंटाईन करून घेतले. दरम्यान, आपण क्वारंटाईन असल्याने पुढच्या आठवड्यात चौकशी करण्याची विनंती प्रताप सरनाईक यांनी केली.
टॉप्स सिक्युरिटी या समुहाविरोधातील आर्थिक गैरव्यवहाराच्या गुन्ह्याप्रकरणी ईडीने प्रताप सरनाईक आणि त्यांची मुले विहंग आणि पूर्वेश यांच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकले होते. प्रताप सरनाईक हे त्यावेळी मुंबई बाहेर होते. त्यामुळे ईडीने विहंग यांची पाच तास चौकशी केली होती. तर बुधवारी प्रताप सरनाईक यांना ईडीने नोटीस बजावून चौकशीसाठी बोलावले. मात्र आपण क्वारंटाईन असल्याने पुढील आठवड्यात चौकशी घ्यावी, अशी विनंती त्यांनी केली होती. त्यानुसार त्यांना आता क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर ईडीसमोर हजर राहावे लागणार आहे.
या प्रकरणी ईडीने प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय अमित चांदोळे यांच्यावर अटकेची कारवाई केली असून चांदोळे हे टॉप्स समूहाचे भागीदारी आहेत. चांदोळे यांच्या अटकेमुळे सरनाईक आणि राहूल नंदा यांच्यातील व्यवहारांबाबत माहिती समोर येईल, अशी ईडीला आशा आहे.

About Editor

Check Also

देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास ‘अजितदादा पवार’ यांचे नाव देण्यास मान्यता महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या १२२ व्या बैठकीत निर्णय

“महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत देशी गाईंचे संगोपन व संवर्धन, तसेच दूध व दुग्धजन्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *