राज्यातील राजकिय पक्षांच्या दिवाळ-दिवाळीच्या मौसमाला सुरुवात निवडणूक आचारसंहिता लागू

नवी दिल्ली -मुंबईः प्रतिनिधी
राज्याच्या विधानसभेचा कालावधी ९ नोव्हेंबर २०१९ रोजी संपत असल्याने तत्पूर्वी नवी विधानसभा अस्तित्वात येणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्य विधानसभेसाठी निवडणूकांची आचारसंहिता आजपासून लागू होत असून २१ ऑक्टोंबर २०१९ रोजी यासाठी मतदार तर २४ ऑक्टोंबरला निकाल जाहीर करण्यात येणार असल्याने सत्तेत विराजमान होणारा राजकिय पक्ष दिवाळी साजरी करणार तर पराभूत होणाऱ्या पक्षाच दिवाळ वाजणार असल्याचे पाह्यला मिळणार आहे.
भारतीय निवडणूक आयोगाने शनिवारी दुपारी १२ वाजता लागू केली आहे. राज्यातील विधानसभेची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी केली असून राज्यात एकाच टप्प्यात २१ ऑक्टोबर २०१९ रोजी मतदान घेण्यात येणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहिर केल्यानुसार राज्यात २७ सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अधिसूचना जाहिर होणार आहे. उमेदवारांना ४ ऑक्टोबर २०१९ पर्यन्त उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. तर ५ ऑक्टोबर २०१९ रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून उमेदवारांना आपली उमेदवारी मागे घेण्यासाठी ७ ऑक्टोबर २०१९ पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. राजकीय पक्षांना मतदारांसमोर जाण्यासाठी आता फ़क्त ३० दिवसच बाकी असल्याने निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.
या निवडणूकीसाठी राज्यातील ८ कोटी ९४ लाख मतदार मतदान करणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी तब्बल १.८ लाख मतदान यंत्रांचा वापर करण्यात येणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघातील एकूण व्हीव्हीपॅट पैकी ५ मतदारसंघातील व्हीव्हीपॅट स्लिपची मतमोजणी दरम्यान मोजली जाणार आहे. हरियाणातही याच पध्दतीने विधानसभेसाठी निवडणूका होणार आहेत.
नेमक्या ऑक्टोंबर महिन्यातच दिवाळी असणार असून निवडणूकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तीनच दिवसांनी दिवाळीला सुरुवात होणार असल्याने दिवाळी आधीच राजकिय  पक्षांच दिवाळ आणि दिवाळी जनतेला अनुभवायला मिळणार आहे.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १५० दिवसांच्या ई- गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट विभागांचा गौरव कामात पारदर्शकता, कालमर्यादा आणि विश्वासार्हतेच्या त्रिसूत्रीवर विभागांनी काम करावे

राज्यातील नागरिकांना सर्व शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ एकाच माध्यमातून मिळण्यासाठी आणि विकसित महाराष्ट्राचे ध्येय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *