अखेर महायुतीने दुपारी ३ वाजता राज्यपालांकडे जात केला सत्ता स्थापनेचा दावा महायुतीच्या दाव्यानंतर राज्यपालांकडून सत्ता स्थापनेचे निमंत्रण

राज्यातील संशयातीत बहुमतानंतर महायुतीतील सहभागी पक्ष असलेल्या काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचा शिवसेना पक्ष, अजित पवार आणि त्यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाच्यावतीने देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी दुपारी ३ वाजता राजभवनावर जात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली. त्यानंतर राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी महायुतीच्या नेत्यांना सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले.

राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी यावेळी महायुतीच्या नेत्यांना समर्थन असलेली कागदपत्रे, आणि पाठींब्याची पत्रे सर्व तपासून घेतली. त्यानंतर राज्यपालांनी महायुतीच्या नेत्यांना सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले. तसेच सत्ता स्थापन करण्यासाठी उद्याच्या दिवसाची मुदत दिली आहे. त्यामुळे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या आधीच जाहिर केल्याप्रमाणे उद्या ५ डिसेंबरला शपथविधी होणार आहे. त्यासाठी स्थळ निश्चितही करण्यात आले आहे. तसेच या शपथविधी सोहळ्यासाठी भाजपाचे केंद्रातील नेते नरेंद्र मोदी, अमित शाह आणि जेपी नड्डा यांच्यासह राजनाथ सिंह हे ही उपस्थित राहण्यासाठी भाजपाकडून निमंत्रण धाडण्यात आले आहे.

याशिवाय भाजपाशासित राज्यातील मुख्यमंत्री आणि एनडीए सरकारमधील मंत्र्यांनाही भाजपाच्यावतीने निमंत्रण पाठविण्यात आले आहे. त्यामुळे हे सर्व मंत्रिगण संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शपथविधी सोहळ्यासाठी हजर राहणार आहे. त्याचबरोबर भाजपाच्या प्रथेनुसार देशाच्या विविध भागातील विविध हिंदूधर्मिय पंथातील साधू पुरुषांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे हिंदूधर्माच्या रितीरिवाजानुसार मुख्यमंत्री पदी विराजमान होणाऱ्या व्यक्तीची शपथविधी सोहळा पार पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, अमेरिकेबरोबर व्यापारी करार केल्याने शेतमालाचे भाव पडले सरकारकडे पैसे नसताना ८८ हजार कोटी रुपयांच्या महामार्गाची गरजच काय?

अमेरिकेबरोबर व्यापारी करार झाल्यापासून भारतातील सर्व शेतमालांचे भाव पडले आहेत, फळांचेही भाव पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *