अखेर नितेश राणे यांना जामीन सिंधुदूर्ग सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला

मराठी ई-बातम्या टीम

सिंधुदूर्ग निवडणूकीच्या प्रचारा दरम्यान शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या भाजपा आमदार निलेश राणे यांना आज अखेर सिंधुदूर्ग सत्र न्यायालयाने जांमीन मंजूर केला. त्यामुळे राणे कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे.

संतोष परब हल्याप्रकरणी नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन यापूर्वी जिल्हा सत्र न्यायालयाने पहिल्यांदा जामीन फेटाळल्यानंतर ते मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु  या दोन्ही न्यायालयांनी त्यांनी संबधित न्यायालयात शरण जाण्याचा सल्ला दिला. तसेच अटक करू नये यासाठी पुरेसा कालावधीही प्रत्येक न्यायालयाने दिला. परंतु अखेर न्यायालयात शरण आल्याशिवाय त्यांना जामीन मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नितेश राणे यांनी अखेर जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सिंधुदूर्ग न्यायालयात शरण आले.
त्यानंतर त्यांनी लगेच सत्र न्यायालयात जामीन अर्ज केला. परंतु सरकारी वकीलांनी त्यांच्या जामीन अर्जास विरोध केला तर पोलिसांनी त्यांच्या ८ दिवसाच्या पोलिस कोठडीची मागणी केली. परंतु सत्र न्यायालयाने त्यांना ४ दिवसाची पोलिस कोठडी सुणावली. त्यानंतर त्यांची गोवा येथील त्यांच्या फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये नेवून चौकशी करण्यात आली. दरम्यान त्यांची पोलिस कोठडी संपत आल्याने ४ फेब्रुवारी रोजी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना १८ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुणावली. याच काळात त्यांच्या छातीचा त्रास सुरु झाल्याचा अर्ज त्यांनी तुरुंग प्रशासनाला सादर केला. त्यानंतर त्यांना उपचार्थ कोल्हापूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा जामीनासाठी अर्ज केला. त्यावर दोन्ही बाजूकडून युक्तीवाद सोमवारी संपणार होता. मात्र सोमवारी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे सोमवारी सुटी आल्याने सोमवारी होणारा युक्तीवाद काल मंगळवारी पूर्ण झाला. त्यावर आज बुधवारी न्यायालयाने निकाल देत नितेश राणे यांना जामीन मंजूर केला. त्याचबरोबर नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांना

About Editor

Check Also

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासनाच्या भरती प्रक्रियेत सुधारणेचा निर्णय संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्याने १८ सेवांचा, ९३ संवर्गाचा समावेश

शासनाच्या विविध पदांवरील भरती प्रक्रिया सुटसुटीत, सक्षम आणि उमेदवारांच्या दृष्टीने सुलभ व्हावी, याकरिता पदभरती प्रक्रियेत सुधारणा करण्यास …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *