विधानसभा निवडणूकीत पहिल्यांदाच विजय मिळविलेले रोहित पाटील यांनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यानंतर विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निवडीनिमित्त सभागृहातील अभिनंदनपर प्रस्तावावर बोलताना रोहित पाटील यांनी सुरेख शब्दपेरणी करणी सत्ताधाऱ्यांबरोबर विधानसभेच्या अध्यक्षस्थानी विराजमान झालेल्या राहुल नार्वेकर यांचेही लक्ष वेधून घेतले.
राहुल नार्वेकर यांच्या निवडीच्या निमित्ताने विधानसभेत मांडण्यात आलेल्या अभिनंदन पर ठरावावर बोलताना रोहित पाटील म्हणाले की, सर्वात तरूण विधानसभा अध्यक्ष म्हणून तुम्हाला मान मिळालेला आहे. पण मलाही सर्वात तरूण आमदार म्हणून जनतेचे संधी दिलेली आहे. त्यामुळे सर्वात तरूण अध्यक्षाने सर्वात तरूण आमदाराकडे लक्ष द्यावे असे म्हणत विधानसभा अध्यक्षांचे लक्ष वेधले.
पुढे बोलताना रोहित पाटील म्हणाले की, तुम्ही जसे निष्णात वकील आहात. तसे माझेही वकीलीचे शिक्षण सध्या सुरु आहे. आज आपल्या देशाचं वेगळंपण टीकून आहे. कारण आपल्या देशाने पूर्वी अनेक शाह्या पाह्यल्या, पण आपल्या वाट्याला लोकशाही आली. त्यामुळे संबध जगभरात आपल्या देशाने स्वतःच वेगळंपण टकू शकलो. तसंच दुसरं कारण म्हणजे, संसदीय पद्धत आपण कमावली. त्यामुळे लोकशाहीला वेगळं महत्व प्राप्त झालं. त्या एकमताच्या माध्यमातून जो अधिकार आपल्याला मिळाला, त्यानुसार इथे सर्व सदस्य बसले आहेत. आपल्याला विनंती करेन की, सर्वात तरूण अध्यक्ष होण्याचा मान जसा तुम्हाला मिळाला आहे. तसा सर्वात तरूण सदस्य बनण्याचा मान मलाही मिळालेला आहे. त्यामुळे सर्वात तरूण सदस्यांकेड सर्वाचे बारीक लक्ष्य असेल, कारण मी सुद्धा वकीलीचं शिक्षण पूर्ण करतोय. एक नंबरवरच्या बाकावर बसलेल्या वकीलाला तुम्ही जशी मदत करता, तशी मदत मलाही कराल असे सांगत विधानसभा अध्यक्षांचे लक्ष्य वेधत देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केलं.
पुढे बोलताना रोहित पाटील म्हणाले की, संत तुकारामाच्या अभंगाचा दाखला देत अमृताहूनही गोड नाम तुझे देवा, पुराणातही अमृताला वेगळेच महत्व होते. आता संताच्या वाणीतून तुमचे नाव गोड असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पुढे काम करत असताना विरोधकांनाही गोड वागणूक द्याल अशी विनंती केली. रोहित पाटील यांच्या भाष्यावर देवेंद्र फडणवीस यांनीही मिश्किल हसून दाद दिली.
Marathi e-Batmya