Breaking News

सुधारीत जाहिरात प्रश्नी मुख्यमंत्री शिंदे यांची स्पष्टोक्ती, अतिउस्ताही कार्यकर्त्या…

गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या शिंदे गटात तणाव असल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. कल्याण लोकसभा मतदार संघावरून दोन्ही पक्षांमधील नेते भिडले. त्यापाठोपाठ राज्यातल्या सर्व प्रमुख वर्तमान पत्रांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याची जाहिरात प्रसिद्ध झाली.

तसेच या जाहिरातीत केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो होते. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. या जाहिरातीनंतर दुसऱ्या दिवशी शिवसेनेच्या शिंदे गटाने आणखी एक जाहिरात प्रसिद्ध केली. ज्या ज्या कारणांमुळे पहिल्या जाहिरातीवर टीका झाली होती, त्या सर्व चुका दुसऱ्या जाहिरातीत दुरुस्त करण्यात आल्या. तसेच पहिली जाहिरात ही शिंदे गटाने किंवा शिंदे गटातील कोणत्याही नेत्याने दिली नव्हती असा दावा करण्यात आला आहे.

उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, ती जाहिरात कुठल्या तरी हिंतचिंतकाने दिली असावी. परंतु त्या हितचिंतकाचं नाव अद्याप कोणीही सांगितलेलं नाही. दरम्यान, या जाहिरातीमुळे भाजपा-शिवसेनेत तणाव निर्माण झाला आहे का? असा प्रश्न प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला. यावर एकनाथ शिंदे म्हणाले, एखाद्या अतिउत्साही कार्यकर्त्याच्या जाहिरातीमुळे ही युती तुटायची नाही. ही युती इतकी कमजोर नाही. वैचारिक भावनेतून ही युती आम्ही केली आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयी होते तेव्हापासूनची ही युती आहे. उलट मधल्या एक वर्षभरात यात जो काही मिठाचा खडा कोणीतरी टाकला होता, तो आम्ही काढून फेकून दिला आहे.

यावर माध्यमांच्या प्रतिनिधिंनी मुख्यमंत्र्यांना विचारलं की, त्या अतिउत्साही कार्यकर्त्याचं नाव काय? तुम्ही त्याचं नाव का सांगत नाही? यावर मुख्यमंत्र्यांनी केवळ स्मितहास्य केलं. त्यामुळे त्यांना विचारण्यात आलं की, ती जाहिरात विरोधकांनी दिली होती का? त्यावर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा स्मितहास्य केलं आणि ते म्हणाले, असू शकतं. परंतु त्या जाहिरातीमुळे आमच्यात वितुष्ट येणार नाही. आमची दोस्ती जोरदार आहे. ‘ये फेविकॉल का जोड है, टुटेगा नही’, हे मी तुम्हाला कालच सांगितलं आहे.

Check Also

पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचे न्यायिक काम परभणीतून

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण व गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच हिंगोली स्वतंत्र न्यायिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *