शिंदे गटाकडून आदित्य ठाकरे लक्ष्य, ‘युवराजांची दिशा नेहमीच चुकलेली’ कालच्या घटनेनंतर आज शिंदे गट झाला आक्रमक

मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून ५० खोके एकदम ओके सारख्या घोषणा देत शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात येत होत्या. मात्र काल पहिल्यांदाच शिंदे गट आणि भाजपाच्या काही आमदारांनी महाविकास आघाडीच्या विरोधात करत धक्काबुक्कीही करण्याचा प्रकार घडला. त्यानंतर आज शिंदे गटाकडून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे सुपुत्र तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना लक्ष्य करत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्याचबरोबर बॅनरही फडकाविले.

शिंदे गटाच्या आमदारांनी आदित्य ठाकरे यांचा कार्टून असलेला फलक दर्शनी फडकावित युवराजांची दिशा नेहमीच चुकलेली असे त्यावर लिहिण्यात आली होती. तसेच बॅनरवर घोड्यावर उलट्या दिशेला तोंड करून आदित्य बसल्याचे दाखविण्यात आले. याशिवाय इतरही घोषणा उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात घोषणा दिल्या.

खालील घोषणा शिंदे गटाकडून देण्यात आल्या…

महाराष्ट्राचे परम पूज्य (पपू) युवराज

२०१४ ला १५१ चा हट्ट धरून युती बुडवली,

२०१९ ला खुर्चीसाठी हिंदुत्वाची विचारधारा पायदळी तुडवली.

पर्यटन खाते घेऊन घरातच बसून केला कहर,

सत्ता गेल्यावर पर्यटनाची आली लहर.

पुन्हा निवडणूक लढवायची देतात ठसन,

स्वतः आमदार व्हायला महापौर व दोन एमएलसीचे लागते कुशन.

खुर्चीत बसल्यावर शिवसैनिकाला केले तडीपार,

सत्ता गेल्यावर आता फिरतात दारोदार.

तुमच्या या खोट्या रडगाण्यावर भुलणार नाही,

युवराजांची कायमच दिशा चुकली.

असं शिंदे गटाकडून झळकावण्यात आलेल्या बॅनरवर लिहिलेलं आहे. त्याचबरोबर शिंदे गटाकडून मातोश्रीवर पैसे खाल्याचा आरोप करणाऱ्या घोषणाही करण्यात आल्या. ‘सचिन वाझेचे खोके, मातोश्री ओके’ ‘अनिल देशमुखचे खोके, मातोश्री ओके’, ‘नवाब मलिकचे खोके, मातोश्री ओके’, अशा घोषणा शिंदे गटाच्या आमदारांकडून करण्यात आला.

About Editor

Check Also

जयंत पाटील म्हणाले, सांगलीच्या मातीने कधीही अविचारांना थरा दिला नाही मतदारांनी जिल्ह्याची ओळख अबाधित ठेवली

जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने तब्बल १८ ठिकाणी विजय मिळवला आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *