Breaking News

दिल्लीला जाण्यासाठी भिमनवार यांनी बैठक सोडली: २४ पासून आरटीओ कर्मचारी संपावर मागण्यांसाठी संघटना आक्रमक

राज्य सरकारने आरटीओतील रिक्त पदे आकृती बंध नुसार भरण्याचे आश्वासन दिले. तसेच त्यासाठी शासन निर्णयही जारी केला. मात्र त्याच दोन वर्षे उलटून गेले तरी आकृती बंध नुसार रिक्त पदांची भरती तर सोडाच त्याची साधी जाहिरातही काढली नाही की, त्याबाबतची माहिती एमपीएसी अर्थात राज्य सेवा आयोगालाही कळविली नाही. त्यामुळे संतापलेल्या आरटी कर्मचारी संघटनेने बेमुदत संपाचे हत्यार उपसले असून राज्याच्या आकृतीबंधनुसार रिक्त पदे भरणे, सद्यस्थितील बदलीचे धोरण रद्द, कळसकर समितीचा अहवाल लागू करणे आदी मागण्या जोपर्यंत  मागण्या मान्य केल्या जात नाही तोपर्यंत कामावर हजर न राहण्याचा निर्धार जाहिर केला असून २४ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय ह मोटारवाहन विभाग कर्मचारी संघटनेने घेतला आहे.

मोटार वाहन विभागाने राज्यातील आरटीओ कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसदर्भात वारंवार परिवहन आयुक्त भिमनवार यांना लेखी पत्राद्वारे मागण्यांसंदर्भात तोडगा काढण्याची मागणी केली. मात्र त्या संदर्भात आयुक्त भिमनवार यांनी सातत्याने संघटनेच्या मागण्यांसकडे दुर्लक्ष केले. सरते शेवटी मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेने शेवटचे पत्र आयुक्त भिमनवार यांना देत २४ सप्टेंबर पासून कर्मचारी संपावर जाणार असल्याचा इशारा परिवहन आयुक्त भिमनवार यांना पत्राद्वारे दिला.

त्यावर परिवहन आयुक्त भिमनवार यांनी १९ ऑगस्ट रोजी मोटार परिवहन विभाग कर्मचारी संघटनेला चर्चेसाठी पाचारण केले. मात्र बैठकीला बसण्यापूर्वीच आयुक्त भिमनवार यांनी मला संध्याकाळी ७ वाजता दिल्लीला बैठकीला जायचे असल्याचे कारण सांगत चर्चेला सुरुवात केली. संघटनेबरोबरची बैठक ही वेळेचे बंधन घालत सुरु केल्याने मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेने त्यांच्या विविध मागण्यांपैकी महत्वाच्या त्याच मागण्या आयुक्त भिमनवार यांच्यासमोर ठेवल्या. मात्र त्यावर सविस्तर चर्चा न करताना गुळमुळीत उत्तर देण्याचा प्रकार आयुक्त भिमनवार यांनी केल्याचा दावा कर्मचारी संघटनेने केला.

शेवटी आयुक्त भिमनवार यांनी कर्मचारी संघटनेच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा न करताच दिल्लीला मला प्लाईट पकडायची असल्याचे सांगत बैठक अर्ध्यावरच सोडून बैठकीतून निघून गेले. आयुक्त भिमनवार यांच्या या अशा वागण्यामुळे कर्मचारी संघटनेने आयुक्तांच्या या वागण्याबाबत आश्चर्य व्यक्त करत जर बैठक नीट घ्यायचीच नव्हती तर बैठक बोलावलीच कशाला असा सवाल उपस्थित केला.

तसेच कर्मचाऱ्याच्या मागण्यांवर संघटनेने चर्चा करताना वेळेचे बंधन घालून बैठक घेणे सर्वथा चुकीचे असल्याने परिवहन आयुक्तांनी त्यांना दिल्लीला जाण्याचा दिवस सोडून इतर दिवस संघटनेसोबत चर्चेला द्यायचा होता, बैठकीच्या नावाखाली कर्मचारी संघटनेसोबत बैठकीचे नाटक करण्याची काय गरज होती असा सवालही कर्मचारी संघटनेने यावेळी उपस्थित केला.

यासंदर्भात भिमनवार यांच्याशी एसएमएसद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही.

एरव्ही प्रशासनातील प्रत्येक गोष्टीसाठी तत्पर असल्याचे दाखविणारे परिवहन मंत्री शंभूराज देसाई आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र आरटीओ कर्मचाऱ्यांच्या मागणीवर मूग गिळून बसले असल्याने दाद कोणाकडे मागायची असा सवालही या निमित्ताने कर्मचारी संघटनेकडून व्यक्त करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत