काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत VVPAT वापरण्याची मागणी केली. यावेळी त्यांच्यासोबत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव प्रफुल्ल गुडधे पाटील, प्रदेश काँग्रेसचे कोषाध्यक्ष अभय छाजेड, डॉ. झिशान हुसेन, इरफान पठाण ,नाशिक शहर काँग्रेस अध्यक्ष आकाश छाजेड आदी उपस्थित होते.
हर्षवर्धन सपकाळ पुढे बोलताना म्हणाले की, निवडणूक निष्पक्ष व पारदर्शक पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्यच आहे. परंतु निवडणूक आयोगाचा सध्याचा कारभार पहात त्यांच्यावरचा विश्वास डळमळीत झाला आहे. मतचोरीसाठी सत्ताधारी पक्षाला मदत करून लोकशाहीवर घाला घातल्याचा प्रकार लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी उघड केला आहे. निवडणूकीत गैरप्रकार होत असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रातही निवडणुकीत गडबड झाल्याचे समोर आले आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत, या निवडणूकीत व्हीव्हीपॅट vvpat वापरणार नाही अशी भूमिका निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. परंतु निवडणुकीतील गैरप्रकार पहाता व्हीव्हीपॅट vvpat वापरावे अशी काँग्रेस पक्षाची मागणी आहे असल्याचेही यावेळी सांगितले.
Marathi e-Batmya