हिंगणघाटमधील पीडीतेला सरकारकडून १० लाखाची मदत महिला व बालविकास राज्यमंत्री बच्चू कडू यांची माहिती

मुंबई-अचलपूरः प्रतिनिधी
हिंगणघाट येथील दरोडा गावातील एका प्राध्यापिकेवर एकतर्फी प्रेमातून झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या पीडीतेचा आज अखेर मृत्यू झाला. या पीडीतेच्या मृत्यूने संबध महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत असून तिच्या नातेवाईकांना  १० लाख रूपयांची मदत राज्य सरकारच्यावतीने मंजूर करण्यात आल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.
या प्रकरणातील आरोपी नगराळे याच्यावर जलदगती न्यायालयात खटला चालवून त्याला कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्य सरकारकडून विशेष सरकारी वकीलाची नियुक्ती करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास ‘अजितदादा पवार’ यांचे नाव देण्यास मान्यता महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या १२२ व्या बैठकीत निर्णय

“महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत देशी गाईंचे संगोपन व संवर्धन, तसेच दूध व दुग्धजन्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *