राष्ट्रवादीचा पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना म्हणाला, डिलीव्हरी बॉय

आगामी पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वच पक्षांनी आपापल्या पद्धतीने तयारीला सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातील वातावरण हळूहळू तापू लागलं आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत कुरघोडी करण्याचा प्रयत्न राजकीय नेतेमंडळी करताना दिसत आहेत. एकीकडे शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असे शिवसेनेतील दोन गट एकमेकांना भिडताना दिसत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. यात आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य करत त्यांना ‘डिलीव्हरी बॉय’ची उपमा दिली.

सध्या सगळीकडे दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत असला, तरी त्याही वातावरणात राजकीय टोलेबाजी मात्र चालूच आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ‘तीन महिन्यांपूर्वीच आम्ही फटाके फोडले’ असं म्हणत ठाकरे सरकार पाडल्याच्या घटनेचा संदर्भ दिल्यानंतर त्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मात्र, त्यासोबतच एकनाथ शिंदे यांनाच शिंदे गट प्रमुख मानत असताना आणि भाजपाकडूनही एकनाथ शिंदेंचा उल्लेख सातत्याने त्याच संदर्भात केला जात असताना नेमक्या याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष आणि पुण्याचे नगरसेवक प्रशांत जगताप यांनी लक्ष्य केले.

पुण्याचे माजी महापौर राहिलेले प्रशांत जगताप यांनी आपल्या ट्विटर हँडलवरूर एकनाथ शिंदेंना लक्ष्य करणारं ट्वीट केले. या ट्वीटमध्ये त्यांनी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतील आमदार फोडून भाजपाच्या गोटात सामील केल्याचा आरोप केला. अनेकांना वाटलं शिंदे साहेब लीडर आहेत. पण प्रत्यक्षात मात्र ते केवळ डिलीव्हरी बॉय निघाले. शिवसेनेतून आमदार भाजपामध्ये सुखरूप पोहोचवण्याचं काम ते करतायत, अशा शब्दांत प्रशांत जगताप यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली.
दरम्यान, या ट्वीटमध्ये या उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना टीप म्हणून काय मिळेल? असा खोचक सवालही जगताप यांनी केला.

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांचे पदोन्नतीमधील आरक्षणासंदर्भात पत्राद्वारे राष्ट्रपतींकडे मागणी सरकारी नोकरीतील पदोन्नतीमधील आरक्षणाची अंमलबजावणी करा

पदोन्नतीमध्ये आरक्षण हा केवळ धोरणाचा विषय नाही तर तो एक घटनात्मक वचन आहे ज्याचा उद्देश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *