Breaking News

जयंत पाटील यांचा सवाल,…अन्यथा ही सरकारची मिलीभगत आहे का? शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात ढकलणाऱ्या बँकांवर कारवाई नाही

व्यापारी बँका व काही खासगी बँका अल्पभूधारक शेतकऱ्यांना सिबिलची सक्ती करून पीककर्जाबाबत अडवणूक करत आहे. शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात ढकलणाऱ्या बँकांवर सरकार कडक कारवाई करत नाही असे म्हणत असताना सरकारची आणि बँकांची ही मिलीभगत आहे का असा सवाल उपस्थित केला.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, सरकारच्या कारवाईच्या बडग्याला न भीता व्यापारी आणि खासगी बँका अल्पभूधारक शेतकऱ्यांना सिबिलची सक्ती करून पीककर्जाबाबत अडवणूक करत आहेत. त्यामुळे शेतकरी राजाला सावकाराच्या दारात जावं लागत असल्याचं सांगितले.

जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या आदेशालाच या बँका केराची टोपली दाखवत असतील तर सामान्य शेतकऱ्यांचे काय ऐकतील? त्यामुळे सरकारने या बँकांना लाडीगोडी न लावता कर्ज देत नसतील तर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी करत सावकारी जाच पुढे शेतकऱ्यांना किती छळतो, या जाचामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येची संख्या वाढते याची सरकारला चांगली कल्पना आहे. तरी शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात ढकलणाऱ्या बँकांवर सरकार कडक कारवाई करताना दिसत नसेल तर ही सरकारची आणि बँकांची मिलीभगत आहे अशी शंका मनात येते असा गंभीर आरोप केला.

Check Also

पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचे न्यायिक काम परभणीतून

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण व गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच हिंगोली स्वतंत्र न्यायिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *